इन्व्हीटेशनल राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत अंकोलीच्या चॅम्पियन्स कराटे क्लबच्या सात विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदके जिंकली

अंकोली (बारामती झटका) दशरथ रणदिवे यांजकडून
महाड (ता. रायगड) येथे नुकत्याच पार पडलेल्या इन्व्हीटेशनल राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत अंकोलीच्या चॅम्पियन्स कराटे क्लबच्या विद्यार्थ्यांनी एकूण सात पदकांची कमाई करत आपले वर्चस्व कायम ठेवले. महाड येथे नुकत्याच इन्व्हीटेशनल राज्यस्तरीय कराटे स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत अंकोलीच्या चॅम्पियन्स कराटे क्लबने आपला सहभाग नोंदविला होता. या क्लबच्या सात विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदके जिंकली आहेत.
यामध्ये कुमीते या प्रकारात विक्रांत बबलू बिस्वास, समर्थ धोंडीबा भालेराव आणि ईशाश्री मानाजी रणदिवे यांनी तर काता या कराटे प्रकारात सृष्टी दशरथ रणदिवे, समर्थ नामदेव गायकवाड, सुमित बाळकृष्ण घोडके आणि संचित सुनिल माळी यांनी सुवर्ण पदकांची कमाई केली. हे खेळाडू शिहान संतोष मोहिते आणि सेन्सई रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अंकोली (ता. मोहोळ) भैरवनाथ विद्यालयात नियमित सराव करतात. त्यांच्या या यशाबद्दल स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य बाबासाहेब क्षीरसागर, सज्जनभाऊ पवार, संग्रामसिंह पवार, प्राचार्य मोहिते सर यांनी अभिनंदन केले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.