ताज्या बातम्या

अकलुज येथील पोलीस वसाहतीतच पोलीस हवालदाराची राहत्या घरात गळफास घेवुन आत्महत्या

अकलूज (बारामती झटका)

अकलूज पोलीस ठाणेस कार्यरत असलेले पोलीस हवालदार सोमनाथ हरीभाऊ कोळी यांनी पोलीस वसाहतीमध्ये राहत्या घरी गळफास घेवुन जिवन संपविले.

याबाबत पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मयत पोलीस हवालदार सोमथान कोळी यांचे मुळ गांव पंढरपूर होते. ते पत्नी व दोन मुलांसह अकलुज येथील पोलीस वसाहतील कॉलनीमध्ये राहत होते.

दि. २८/०८/२०२४ रोजी दु.१.३० ते २.३० वा. चे दरम्यान पोलीस हवालदार सोमनाथ कोळी यांनी राहते घरातील बेडरुममधील छताच्या पंख्याला साडीने गळफास घेतल्याने त्यांना त्यांची पत्नी व बाजुस राहणारे पोलीस अंमलदार यांनी तात्काळ वाहनातुन उपचारासाठी अकलाई आय.सी.यु. सेंटर अकलूज येथे घेवुन गेले. तेथील डॉक्टरांनी तपासून ते मयत झाले असलेचे सांगितले.

त्यांचे पाठीमागे त्यांच्या कुटुंबात पत्नी, दोन मुले, आई, भाऊ, भावजय असा परिवार आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button