माढा लोकसभेचे पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी माळशिरसची सुवर्णकन्या ऋतुजा भोसले हिचा सन्मान केला…

आशियाई क्रीडा स्पर्धेत माळशिरसची सुकन्या ऋतुजा भोसले हिच्या तालुक्यातील जंगी मिरवणूकीमध्ये सहभागी होऊन माढा लोकसभेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या..
माळशिरस (बारामती झटका)
माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत दैदीप्यमान सोनेरी कामगिरी करून देशाच्या शिरपेचामध्ये मानाचा सोनेरी तुरा रोवणाऱ्या माळशिरस तालुक्यातील लवंग गावची सोनेरी कन्या ऋतुजा भोसले हिचा सन्मान माळशिरस तालुक्याच्या सरहद्दीवर सराटी या ठिकाणी करण्यात आला. यावेळेस भाजपचे सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष चेतनसिंह उर्फ बाळासाहेब केदार सावंत यांच्यासह तालुक्यातील हजारो लोकांच्या जनसमुदायांमध्ये उत्स्फूर्तपणे निघालेल्या रॅलीमध्ये पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी सोनेरी कन्या ऋतुजा भोसले हिचा सन्मान करून तीच्या यशाबद्दल कौतुक करून तमाम माढा लोकसभा मतदार संघातील मतदार व जनतेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

आशियाई क्रीडा स्पर्धेत रोहन बोपण्णा आणि माळशिरसची सुवर्णकन्या ऋतुजा भोसले या जोडीने टेनिसच्या मिश्र दुहेरीत सुवर्णपदक पटकावले. भारतीय जोडीने अंतिम फेरीत तैपेई जोडीचा २-६, ६-३, १०-४ असा पराभव केला. भारतीय जोडीने अंतिम सामन्यातील पहिला सेट गमावला होता. मात्र, दुसऱ्या सेटमध्ये रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले यांनी शानदार पुनरागमन करत अखेर सुपर टाय ब्रेकमध्ये सामना जिंकला.



रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले या भारतीय जोडीला पहिल्या सेटमध्ये दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यांना तैपेई जोडीने ६-२ ने पराभूत केले. यानंतर भारतीय जोडीने दुसऱ्या सेटमध्ये शानदार पुनरागमन करत तैपेईच्या अन-शुओ लियांग आणि त्सुंग-हाओ हुआंग या जोडीचा १०-४ असा पराभव करत सामना १-१ असा बरोबरीत सोडवला. त्यानंतर दोघांमधील निर्णय सुपर टाय ब्रेकमध्ये घेण्यात आला, ज्यामध्ये रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले यांनी टेनिसच्या मिश्र दुहेरीत १०-४ असा शानदार स्कोअर करून इतिहास रचला आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिले. याबद्दल पहिल्यांदाच माय भूमीमध्ये परतल्यानंतर लवंग ग्रामस्थ, परिवार व नातेवाईक यांच्यावतीने भव्य दिव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सायंकाळी लवंग मूळ गावी सत्काराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng