चि. अक्षय शेळके, गुरसाळे (पुणे) आणि चि. सौ. कां. ऐश्वर्या काळे, नातेपुते यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार…

प्रेषक – श्री. हनुमंत बाळकृष्ण पाटील माजी सरपंच, कारूंडे, श्री. दिलीप बबनराव कोरटकर माजी सरपंच, गुरसाळे
गुरसाळे (बारामती झटका)
स्वर्गीय विठोबा धोंडीबा शेळके यांचे नातू व श्री. दत्तात्रय विठोबा शेळके रा. गुरसाळे (पुणे), ता. माळशिरस यांचे ज्येष्ठ चिरंजीव अक्षय आणि स्वर्गीय नारायण अण्णा काळे यांची नात व श्री. विलास नारायण काळे रा. नातेपुते, ता. माळशिरस यांची द्वितीय कन्या चि. सौ. कां. ऐश्वर्या यांचा रविवार दि. 18/02/2024 रोजी दुपारी 02 वाजून 56 मिनिटे या शुभ मुहूर्तावर राज आनंद मंगल कार्यालय, दहिगाव रोड, नातेपुते, ता. माळशिरस, येथे शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित राहावे असे प्रेषक कारूंडे गावचे माजी सरपंच श्री. हनुमंत बाळकृष्ण पाटील गुरसाळे गावचे माजी सरपंच श्री. दिलीप बबनराव कोरटकर आणि समस्त शेळके परिवार यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.


ब्रह्मसुतामध्ये गाठ बांधली सात जन्माची,
पृथ्वीतलावर जोडी शोभते अक्षय आणि ऐश्वर्याची,
पूर्व जन्माची पुण्याई काळे घराण्याची,
कन्या देऊनी वाढविली कीर्ती नावाची,
पुण्य पवित्र निर्मळ गंगा शंकराची,
इंद्राची परी तशी सून शेळके घराण्याची,
सगे सोयरे इष्टमंडळी येऊनि शोभा वाढवावी मंडपाची,
माथ्यावरती पडू द्या अक्षता तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाची…
माळशिरस पंचायत समितीच्या माजी सदस्या सौ. संगीता दत्तात्रय शेळके व उद्योजक दत्तात्रय विठोबा शेळके यांच्या वतीने मित्रपरिवार व नातेवाईक यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. लग्नाच्या घाईगडबडीत कोणाला आमंत्रण अथवा निमंत्रण देण्याचे नजरचुकीने विसरून गेले असल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे असे फलकन मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज चिंचवड पुणे, फार्मोनिक्स प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड चिंचवड पुणे, लक्ष्मी इंडस्ट्रीज चिंचवड पुणे कंपन्यांचे मालक उद्योजक श्री. दत्तात्रय विठोबा शेळके यांच्यावतीने मित्रपरिवार, नातेवाईक, उद्योग, व्यवसायिक यांना नम्र आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.