माळशिरस येथे महाशिवरात्र निमित्त भव्य यात्रेचे आयोजन

माळशिरस (बारामती झटका)
जाधववस्ती ता. माळशिरस, येथे शिवशक्ती महाशिवरात्र यात्रा कमिटी जाधववस्ती यांच्यावतीने महाशिवरात्र निमित्त महाशिवरात्र भव्य यात्रेचे आयोजन गुरुवार दि. ७/३/२०२४ ते शनिवार दि. ८/३/२०२४ रोजी महादेव मंदिरासमोरील पटांगण, जाधववस्ती, येळीव-मायनर फाटा येथे करण्यात आले आहे.
यामध्ये गुरुवार दि. ७/३/२०२४ रोजी रात्री ९ ते १२ वाजता भारुडसम्राट ह. भ. प. सावता केशव फुले महाराज सणसर यांचा भारुडाचा कार्यक्रम होणार आहे.


शुक्रवार दि. ८/३/२०२४ रोजी सकाळी ६ ते ८ वाजता ह. भ. प. शरदकाका माळशिरस यांच्या शुभहस्ते महापूजा करण्यात येणार आहे. तसेच दुपारी ३ ते ६ या वेळेत विविध पारंपारिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तर सायंकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत संत सावता माळी भजनी मंडळ माळशिरस यांच्या भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ९ ते ११ ह. भ. प. बाळासाहेब महाराज देशमुख भूम परांडा, धाराशिव यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार ९/३/२०२४ रोजी सकाळी ९ ते ११ ह. भ. प. भागवत महाराज जळगावकर पंढरपूर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. तर सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी पंचक्रोशीतील जास्तीत जास्त भाविकभक्तांनी व ग्रामस्थांनी या भव्य यात्रेचा लाभ घेण्याचे आवाहन शिवशक्ती महाशिवरात्र यात्रा कमिटी जाधववस्ती यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.