माळशिरस येथे सिद्धनाथ मोटर्सचे उद्घाटन सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते यांच्या शुभहस्ते संपन्न झाला…

वेळापूर येथे सिद्धनाथ मोटर्सच्या यशस्वी वाटचालीनंतर दुसऱ्या शाखेचा माळशिरस येथे धुमधडाक्यात व उत्साही वातावरणात उद्घाटन समारंभ संपन्न झाला….
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस शहरांमध्ये सिद्धनाथ मोटर्सच्या वेळापूर येथील यशस्वी वाटचालीनंतर दुसऱ्या शाखेचे उद्घाटन धुमधडाक्यात व उत्साही वातावरणात माळशिरस पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, श्री. वैभव माळी, श्री. मालोजीराव देशमुख, श्री. साहेबराव देशमुख, श्री. विजयकुमार मिरगे, आर्ट ऑफ लिव्हिंग माळशिरस आश्रम श्री. सुहास माने, इस्कॉन मंदिर पंढरपूर प्रभुजी, श्रीराम भक्त मंडळ कारखेल सह्याद्री प्रतिष्ठान ग्रुप वेळापूर सिद्धनाथ मोटर्स सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत सोमवार दि. ४ मार्च २०२४ रोजी उद्घाटन समारंभ संपन्न झाला.
वेळापूर ता. माळशिरस येथे श्री. संजय देशमुख व श्री. उद्धव देशमुख या दोन बंधूंनी १ आक्टोंबर २०१७ रोजी वर्कशॉप सुरू केलेले होते. सदरच्या सिद्धनाथ मोटर्स वर्कशॉपमध्ये होलसेल ऑइल केमिकल टूर्स अँड ट्रॅव्हल्स असे उद्योग व्यवसायामध्ये रामलक्ष्मणासारख्या असणाऱ्या दोन भावांनी उद्योग व्यवसायात प्रगती करून यश संपादन केलेले आहे. सिद्धनाथ उद्योग समूहामध्ये रूपांतर होऊन दिवसेंदिवस उद्योग व्यवसायात रोपट्याची वटवृक्षाकडे वाटचाल सुरू आहे.


वेळापूरच्या यशानंतर माळशिरस शहरामध्ये सिद्धनाथ उद्योग समूहाने दुसरी शाखा सुरू केलेली आहे. ग्राहकांचा विश्वास संपादन करून खात्रीशीर व किफायतशीर किंमतीमध्ये सिद्धनाथ मोटर्समध्ये ग्राहकांना सेवा उपलब्ध केली जाते. ग्राहकांचा वाढता प्रतिसाद आणि सिद्धनाथ मोटरच्या सर्व टीमचे सदस्य यांच्या विनयशीलतेमुळे दिवसेंदिवस सिद्धनाथ मोटर्स यशोगाथा वाढत आहे. भविष्यात मोठा उद्योग समूह होईल, अशी सिद्धनाथ मोटर्सची वाटचाल सुरू आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.