ठाकरे गटाची साथच नको, काँग्रेसचा पक्षांतर्गत सूर ?

मुंबई (बारामती झटका)
अलीकडे विधानसभा निवडणूक पार पडली. यात महायुतीला जबरदस्त यश आले तर दुसऱ्या बाजुला महाविकास आघाडी नेस्तनाबूत झाली. महाविकास आघाडी 50 मध्ये गारद झाली. त्यानंतर आता महाविकास आघाडी किती दिवस भक्कम असेल, याबद्दल उलट-सुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान, ठाकरे गटासोबत फारकत घ्यावी, असा सूर काँग्रेसमधील काही वर्गाचा आहे.
लोकसभा निवडणूक काळात ठाकरे गटाच्या नेत्यांनी घेतलेल्या ताठर भूमिकेवर काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. सांगलीच्या जागेवरून या दोन्ही पक्षातील अंतर्गत वाद विकोपाला गेला होता. सांगली मतदारसंघातील काँग्रेसची ताकद अधिक असल्याने ही जागा आपल्याला मिळावी यासाठी प्रयत्न झाले. मात्र, उद्धव ठाकरे यांनी त्या जागेबाबत काहीही भूमिका घेतली नाही. अखेर काँग्रेसचे विशाल पाटील अपक्ष लढले आणि विजयीसुद्ध झाले. त्यामुळे अशा हेकेखोर शिवसेनेच्या नेत्यांमुळे आपले नुकसान होत आहे, अशी भावना काही काँग्रेसच्या नेत्यांची आहे, असाही एक सूर आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.