ताज्या बातम्याशैक्षणिक

चाकोरे येथील जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

चाकोरे (बारामती झटका)

जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा चाकोरे येथे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून चाकोरे ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक श्री. राहुल बापू वाघमोडे हे होते तर, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री. शंकर भिताडे यांनी भूषविले. यावेळी ध्वजारोहण कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री. राहुल बापू वाघमोडे यांच्या हस्ते झाले.

यावेळी व्यासपीठावर मा. सदस्या सौ. मंगलताई वाघमोडे, मेजर बाळासाहेब जाधव, सुरेश आबा पाटील, नेव्ही सैनिक आनंद जाधव, कृष्णा सर्वगोड, संग्रामसिंह चव्हाण, ॲड. चंद्रकांत शिंदे, नवनाथ जाधव, दादासो पाटील, ज्योतीराम जाधव, अनिल शिंदे, यशवंत साठे, विष्णु शिंदे सर, महादेव माने, रामचंद्र कस्तुरे, महादेव शिंदे, दत्तात्रय कदम, सोमनाथ डोंबाळे, अक्षय कदम, शिवाजी धुमाळ, धनंजय वाघमोडे, सागर वरकड, गणेश नलवडे, नवनाथ शिंगटे, नवनाथ पवार, बाळासो शिंदे सर उपस्थित होते. त्याचबरोबर स्वातंत्र्य दिनाच्या या कार्यक्रमासाठी गावातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, सन्माननीय ग्रामस्थ, तरुण वर्ग, महिला भगिनी, सर्व शिक्षक वृंद, ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच प्राथमिक शाळा व अंगणवाडीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित सर्वांचे स्वागत झाल्यानंतर बँड पथकासोबत विद्यार्थ्यांनी सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार केले. त्याचे नियोजन कदम सर यांनी केले. तदनंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. शिंदे सर यांनी केले. स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेतील चौदा विद्यार्थ्यांनी भाषणे केली. तसेच काही विद्यार्थ्यांनी पारंपारिक खेळांची प्रात्यक्षिके दाखविली.

आजी माझी सैनिकांचा सन्मान या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतीच्या वतीने मेजर श्री. जाधव साहेब, श्री. सर्वगोड साहेब, श्री. आनंद जाधव साहेब तसेच शाळेसाठी गेल्या वर्षभर अविरत ज्ञानदानाचे कार्य करणारे माजी मुख्याध्यापक श्री. क्षीरसागर सर यांचाही सत्कार करण्यात आला.

यानंतर अभिरूप स्कॉलरशिप परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शाळेतील सहशिक्षक श्री. प्रदीप राजगुरू सर यांना दीपस्तंभ पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही शाळा व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक पठाण सर, शिंदे मॅडम व कदम सर यांचाही ग्रामस्थ व शा. व्य.समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

त्यानंतर आनंद जाधव साहेब व शा. व्य. स. अध्यक्ष धनंजय वाघमोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षिय भाषणामध्ये शंकर भिताडे यांनी स्वातंत्र्य दिनाविषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे फलक लेखन पठाण सर यांनी केले तर आकर्षक रांगोळी शिंदे मॅडम व गायकवाड मॅडम यांनी काढली. तसेच विद्यार्थी बैठक व्यवस्था क्षीरसागर सर यांनी केली. शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजगुरू सर यांनी केले तर आभार कदम सर यांनी मानले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Back to top button