ज्येष्ठ पत्रकार गहिनीनाथ वाघंबरे सर यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन…
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस शहरातील ज्येष्ठ पत्रकार गहिनीनाथ वाघंबरे सर यांचे वयाच्या 84 व्या वर्षी गुरुवार दि. 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर माळशिरस येथील स्मशान भूमीत शोकाकुल वातावरणात सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत.
गहिनीनाथ वाघंबरे सर सेवानिवृत्त झाल्यापासून पत्रकारिता क्षेत्रात दैनिक सकाळ प्रतिनिधी म्हणून काम केलेले आहे. माळशिरस व माळशिरस परिसरातील अनेक समस्यांना वाचा फोडलेली आहे. त्यांचा स्वभाव मनमिळावू होता. त्यांचे सर्वांशी चांगले संबंध होते. त्यांचा जन्म दि. 01 ऑगस्ट 1944 रोजी माळीनगर येथे झालेला आहे.
सरांचा जन्म ऑगस्ट महिन्यातील आणि अखेरचा श्वास सुद्धा 15 ऑगस्ट रोजीच घेतलेला आहे. गहिनीनाथ वाघंबरे सर यांनी अनेक विद्यार्थी घडविलेले आहेत. वाघंबरे परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो आणि मृतात्म्यास शांती लाभो हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.