चि. धनंजय जाधव, मळोली आणि चि. सौ. कां. अश्विनी बाबर, आलेगाव यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार…

प्रेषक – श्री. शिवाजीराव मारुती जाधव विश्व हिंदू परिषद जिल्हा अध्यक्ष, विशेष संपर्कप्रमुख पंढरपूर, श्री. चंद्रकांत ज्ञानेश्वर जाधव
उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका,
माजी उपसरपंच ग्रामपंचायत, मळोली
मळोली (बारामती झटका)
श्री. शिवाजीराव मारुती जाधव रा. मळोली, ता. माळशिरस, यांचे ज्येष्ठ चिरंजीव धनंजय आणि श्री. विलास पांडुरंग बाबर मुळगाव आलेगाव, रा. बिलेवाडी, ता. सांगोला यांची सुकन्या चि. सौ. कां. अश्विनी उर्फ राधिका यांचा शाही शुभविवाह सोहळा मंगळवार दि. 27/2/2024 रोजी दुपारी 12 वाजून 20 मिनिटे या शुभमुहूर्तावर बिलेवाडी हॉटेल गुरुदत्त, सांगोला-पंढरपूर रोड, ता. सांगोला येथे संपन्न होणार आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित रहावे, असे प्रेषक विश्व हिंदू परिषद जिल्हा अध्यक्ष विशेष संपर्कप्रमुख पंढरपूर श्री. शिवाजीराव मारुती जाधव व भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका उपाध्यक्ष मळोली गावचे माजी उपसरपंच श्री. चंद्रकांत ज्ञानेश्वर जाधव आणि समस्त जाधव परिवार मळोली यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.
विवाह म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन, सनई चौघड्यांच्या मंजुळ स्वरात, नव जीवनात केलेले पदार्पण, सुख स्वप्नांच्या पाकळ्यांचे नाजूक उन्मीलन, सासर आणि माहेरच्या नात्यांची मंगळसूत्रात केलेली पवित्र गुंफण यासाठी हवा शुभाशीर्वाद व शुभेच्छा म्हणूनच या शुभविवाह सोहळ्याचे आपणांस आग्रहाचे निमंत्रण आहे.

लग्नाच्या घाईगडबडीत नजरचुकीने आपणांस हस्ते पर हस्ते आमंत्रण अथवा निमंत्रण न मिळाल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे, असे वरपिता श्री. शिवाजीराव मारुती जाधव आणि समस्त जाधव परिवार मळोली यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.