ताज्या बातम्याराजकारण

भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी सोपानकाका नारनवर यांची निवड..

भारतीय जनता पक्षाचे माळशिरस तालुका अध्यक्ष, सोलापूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष पदावरून किसान मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी निवड…

माळशिरस (बारामती झटका)

उंबरे दहिगाव गावचे ज्येष्ठ नेते माजी सरपंच सोपानकाका नारनवर यांची भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश किसनराव भेगडे यांनी प्रदेश सचिव पदी निवड केली आहे.

उंबरे दहिगाव गावचे ज्येष्ठ नेते सोपानकाका नारनवर यांनी भारतीय जनता पक्षामध्ये निष्ठेने व प्रामाणिकपणे काम केलेले आहे. भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका अध्यक्ष पदावर असताना माळशिरस तालुक्यात खऱ्या अर्थाने कमळ फुलले आहे. माढा लोकसभा मतदार संघाचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते असे खासदार व आमदार सोपानकाका नारनवर भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष पदावर कार्यरत असताना जनतेने निवडून दिलेले आहेत.

माळशिरस तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळून सोपानकाका नारनवर यांनी संजय गांधी निराधार योजनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष पद सांभाळलेले होते.

सध्या भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. केंद्रीय दूरसंचार विभागाच्या सोलापूर जिल्हा सल्लागार सदस्य पदी कार्यरत आहेत. माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरणे तळागाळात पोचवण्याचे काम प्रामाणिकपणे केलेले असल्याने भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे. प्रामाणिकपणे केलेल्या कार्याचा व निष्ठेमुळे भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी काम करण्याची संधी प्रदेशाध्यक्ष गणेश किशनराव भेगडे यांनी दिलेली आहे. सोपानकाका नारनवर यांच्या निवडीने भारतीय जनता पक्षामध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

One Comment

  1. Modern Talking был немецким дуэтом, сформированным в 1984 году. Он стал одним из самых ярких представителей евродиско и популярен благодаря своему неповторимому звучанию. Лучшие песни включают “You’re My Heart, You’re My Soul”, “Brother Louie”, “Cheri, Cheri Lady” и “Geronimo’s Cadillac”. Их музыка оставила неизгладимый след в истории поп-музыки, захватывая слушателей своими заразительными мелодиями и запоминающимися текстами. Modern Talking продолжает быть популярным и в наши дни, оставаясь одним из символов эпохи диско. Музыка 2024 года слушать онлайн и скачать бесплатно mp3.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort