चि. मयूर सुळे पाटील (P. S. I.), पुरंदावडे व चि. सौ. कां. डॉ. ऐश्वर्या चव्हाण (B. H. M. S., P. G. D. E. M. S.), माळशिरस यांचा शाही शुभ विवाह सोहळा होणार संपन्न

श्री. बाळासाहेब सुळे पाटील, पुरंदावडे व डॉ. बाबासाहेब चव्हाण, माळशिरस यांचे ऋणानुबंध रेशीमगाठीत बांधले जाणार
माळशिरस (बारामती झटका)
कै. आत्माराम कृष्णा सुळे पाटील यांचे नातू व श्री. बाळासाहेब आत्माराम सुळे पाटील, रा. पुरंदावडे, ता. माळशिरस यांचे सुपुत्र चि. मयूर (P. S. I.) व कै. शंकरराव रामचंद्र चव्हाण यांची नात व श्री. डॉ. बाबासाहेब शंकरराव चव्हाण, रा. माळशिरस, ता. माळशिरस, यांची सुकन्या चि. सौ. कां. ऐश्वर्या (B. H. M. S. P. G. D. E. M. S.) यांचा शाही शुभविवाह सोहळा मंगळवार दि. २२/४/२०२५ रोजी दुपारी १२.२५ वा. अक्षता मंगल कार्यालय, माळशिरस-अकलूज रोड, ६१ फाटा, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे. या शाही शुभ विवाह सोहळ्यास उपस्थित राहून वधू-वरांना अक्षतारुपी शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहण्याची विनंती श्री. अशोक आत्माराम सुळे पाटील यांच्यावतीने करण्यात आली आहे.
लग्न म्हणजे जन्मोजन्मीचे ऋणानुबंध, एकमेकांच्या साथीने दोन कुटुंबांना जोडणारा रेशीमबंध, एका मुहूर्तावर सर्वांच्या साक्षीने एकमेकांच्या साथीने आयुष्य जगण्याचे बंधन… आणि याच मुहूर्तावर वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त सुळे पाटील परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.