Uncategorized

चि. प्रज्योत झंजे, मेडद आणि चि. सौ. कां. मनीषा शेंडगे, रेडे यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार…

प्रेषक
आ. श्री. उत्तमराव शिवदास जानकर
माळशिरस विधानसभा मतदारसंघ.
श्री. प्रतापदादा माणिक झंजे
त्रिमूर्ती केसरी.
श्री. युवराजतात्या भीमराव झंजे
माजी सरपंच, मेडद ग्रामपंचायत.

मेडद (बारामती झटका)

स्वर्गीय भीमराव अण्णा झंजे यांचा नातू व श्री. बाळू भीमराव झंजे रा. मेडद, ता. माळशिरस यांचे ज्येष्ठ चिरंजीव प्रज्योत उर्फ बापू आणि स्वर्गीय श्रीरंग हनुमंत शेंडगे यांची नात व श्री. राजू श्रीरंग शेंडगे रा. रेडे, ता. माळशिरस यांची जेष्ठ कन्या चि. सौ. कां. मनीषा शेंडगे यांचा शाही शुभविवाह सोहळा गुरुवार दि. 05/12/2024 रोजी दुपारी 01 वा.00 मि. या शुभमुहूर्तावर श्रीकाळ भैरवनाथ मंदिरासमोर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेडद, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहेत. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित रहावे, असे प्रेषक माळशिरस विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री. उत्तमराव शिवदास जानकर, त्रिमूर्ती केसरी श्री. प्रताप (दादा) माणिक झंजे, मेडद गावचे माजी सरपंच श्री. युवराजतात्या भीमराव झंजे यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.

मेहंदीच्या हाताने, हळदीच्या अंगाने, मधुर स्वराने, कुलदेवतांच्या साथीने, मातापित्यांच्या आशीर्वादाने, सप्तपदींच्या पवित्र बंधनाने एकमेकांस आजन्म साथ देणाऱ्या नवदांपत्यास शुभ आशीर्वाद देण्यास आपण सहकुटुंब उपस्थित राहावे, असे सौ. विमल व श्री. बाळू भीमराव झंजे, सौ. बायडाबाई व श्री. युवराज भीमराव झंजे, सौ. मीनाक्षी व श्री. सहदेव अण्णा झंजे आणि समस्त झंजे परिवार मेडद यांच्यावतीने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

लग्नाच्या घाईगडबडीत आपणांस हस्ते परहस्ते आमंत्रण अथवा निमंत्रण न मिळाल्यास मित्रपरिवार व नातेवाईक यांनी हेच आमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे असे मेडद गावचे माजी सरपंच श्री. युवराज (तात्या) झंजे यांच्यावतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button