चि. साकेत सपकाळ, माळशिरस आणि चि. सौ. कां. काजल पाटील, श्रीपुर यांचा शाही शुभ विवाह सोहळा होणार संपन्न

प्रेषक दत्तात्रय राजाराम सपकाळ यांच्या वतीने शुभ विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आग्रहाचे निमंत्रण
माळशिरस (बारामती झटका)
कै. राजाराम कृष्णा सपकाळ यांचे नातू व श्री. शिवाजी राजाराम सपकाळ रा. माळशिरस, ता. माळशिरस यांचे सुपुत्र चि. साकेत (B. Pharm) आणि कै. कृष्णात बाबुराव पाटील यांची नात व श्री. केशव कृष्णा पाटील रा. श्रीपुर, ता. माळशिरस यांची सुकन्या चि. सौ. कां. काजल (B. Pharm) यांचा शाही शुभ विवाह सोहळा शुक्रवार दि. २६/४/२०२४ रोजी दुपारी १२ वाजून ४० मिनिटे या शुभमुहूर्तावर जाधव फंक्शन हॉल, म्हसवड रोड, माळशिरस, ता. माळशिरस, येथे संपन्न होणार आहे. तरी नातेवाईक, मित्रपरिवार व आप्तेष्ट यांनी वधूवरांना शुभा आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहण्याची विनंती प्रेषक दत्तात्रय राजाराम सपकाळ यांनी केली आहे.
आपणा सर्वांच्या साक्षीने, वाद्यांच्या गजरात, सनईच्या मधुर स्वरात, या पवित्र मंगलक्षणी आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वादाने हा सोहळा साजरा व्हावा, म्हणूनच हे आग्रहाचे निमंत्रण सपकाळ परिवार व पाटील परिवार यांच्या वतीने देण्यात आले आहे. लग्नाच्या घाईगडबडीत नजर चुकीने आमंत्रण निमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून उपस्थित राहण्याची विनंती सपकाळ व पाटील परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.