चि. विवेक यादव-कोरटकर, गुरसाळे आणि चि. सौ. कां. कोमल तावरे, सांगवी यांचा शाही शुभ विवाह सोहळा होणार संपन्न
श्री. जयप्रकाश यादव-कोरटकर, गुरसाळे आणि श्री. राजेंद्र तावरे, सांगवी यांचे ऋणानुबंध रेशीमगाठीत जोडले जाणार
गुरसाळे (बारामती झटका)
कै. गुलाबराव मारुती यादव-कोरटकर यांचे नातू व श्री. जयप्रकाश गुलाबराव यादव-कोरटकर, रा. गुरसाळे, ता. माळशिरस, जि. सोलापूर यांचे सुपुत्र चि. विवेक आणि कै. उत्तमराव विठ्ठलराव तावरे यांची नात व श्री. राजेंद्र उत्तमराव तावरे रा. सांगवी, ता. बारामती, जि. पुणे यांची सुकन्या चि. सौ. कां. कोमल यांचा शाही शुभविवाह सोहळा मंगळवार दि. ९/७/२०२४ रोजी दुपारी १२.४० वा. या शुभमुहूर्तावर शिवतीर्थ मंगल कार्यालय, माळेगाव सहकारी साखर कारखाना, ता. बारामती, जि. पुणे येथे संपन्न होणार आहे.
तरी या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून वधूवरांना अक्षतारुपी शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन यादव-कोरटकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
तरी लग्नाच्या घाईगडबडीत नजरचुकीने आमंत्रण निमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे, असे आवाहन समस्त यादव-कोरटकर परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
I do not even know how I ended up here but I thought this post was great I dont know who you are but definitely youre going to a famous blogger if you arent already Cheers