ताज्या बातम्या

माळशिरस पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी मनोज राऊत यांची जिल्हा परिषद धाराशिव येथे बदली…

करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री‌ मनोज बापूराव राऊत यांची प्रकल्प संचालक जल जीवन मिशन जिल्हा परिषद धाराशिव येथे बदली

माळशिरस (बारामती झटका)

करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पदाचा प्रभारी पदभार असणारे श्री. मनोज बापूराव राऊत यांची महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाच्या अवर सचिव डॉ. शर्मिला जोशी यांनी प्रकल्प संचालक जलजीवन मिशन जिल्हा परिषद धाराशिव येथे बदली करण्यात आलेली आहे.

करमाळा पंचायत समितीचा मूळ पदभार असताना माळशिरस पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी श्री. मनोज बापूराव राऊत यांनी पदभार स्वीकारून प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात केलेली होती. अवघ्या चार महिन्याच्या कालावधीमध्ये पंचायत समितीमध्ये लोकाभिमुख प्रशासन चालवून सर्वसामान्य जनता व प्रशासनातील अधिकारी यांचा समन्वय साधून पंचायत समितीचा कारभार चांगल्या पद्धतीने हाताळलेला होता. माळशिरस पंचायत समितीच्या प्रभारी गटविकास अधिकारी पदावर काम करणारे कर्तव्यदक्ष अधिकारी ठरलेले आहेत. कमी दिवसात त्यांनी प्रशासनात व सर्व सामान्य जनतेमध्ये आपले कौशल्य दाखवून कार्याची छाप पाडलेली होती.

करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज बापूराव राऊत यांचे मूळ गाव करमाळा तालुक्यातील घोटी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून 2014 साली त्यांची चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुरुवातीस नेमणूक झाली. त्यानंतर त्यांनी बुलढाणा, लातूर जिल्ह्यात काम केलेले आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी पदावर कार्यरत होते. प्रशासनावर वचक व कार्याची पद्धत, जनता व अधिकारी यांचा समन्वय असणारे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी मनोज बापूराव राऊत यांच्याकडे माळशिरस पंचायत समितीचा प्रभारी पदभार देण्यात आलेला होता. दोन्ही तालुक्यांचा कार्यक्षमपणे कारभार करणारे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी यांच्याकडे प्रकल्प संचालक जल जीवन मिशन जिल्हा परिषद धाराशिव जबाबदारी देण्यात आलेली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

4 Comments

  1. Hello!Thiis post could not be writrten any better! Readibg thijs post remnds
    mme of my old room mate! He always kwpt talkking
    about this. I will forward thus article to him. Prettty surde hhe wll have a good read.
    Thanks for sharing!

Leave a Reply

Back to top button