दहिगाव ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदाची तिरंगी लढत तर ग्रामपंचायत सदस्य यांच्यात समोरासमोर लढत.
दहिगाव (बारामती झटका)
माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील मोठ्या ग्रामपंचायतींपैकी प्रतिष्ठेची असणारी दहिगाव ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच पदासाठी तीन उमेदवार तर उर्वरित 17 जागांपैकी दोन जागा बिनविरोध झालेल्या असून 15 जागांसाठी दोन पॅनलमध्ये समोरासमोर लढत लागलेली आहे.
नारीशक्ती ग्रामविकास पॅनलमधून थेट जनतेतील सरपंच पदासाठी सौ. सोनम रणजीत खिलारे, तर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी कु. मिताली बाळासाहेब कदम, सौ. सविता धनाजी ढगे, सौ. मोनाली अतुल मोरे, सौ. संगीता तानाजी वलेकर, सौ. लता धनाजी खुसपे, सौ. छाया अर्जुन सरवदे, सौ. शुभांगी संदीप सावंत, सौ. वर्षा पांडुरंग पाटील, सौ. संध्या सतीश बनकर, सौ. मनीषा सचिन पवार, सौ. रोहिणी सोमनाथ खंडागळे, सौ. चांगुना जयवंत साळवे, सौ. शुभांगी राहुल निकम, सौ. सारिका रवींद्र चिकणे, श्रीमती नीला महादेव अवघडे असे पंधरा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर वार्ड क्रमांक तीन मधील फुले रामचंद्र काशिनाथ व फुले आशाताई संभाजी हे दोन उमेदवार बिनविरोध झालेले आहेत.
परिवर्तन पॅनलमधून थेट जनतेतील सरपंच पदाचे उमेदवार मोरे अपेक्षा मुकुंद, तर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी फुले विशाल नामदेव, शिंदे वैशाली किशोर, खिलारे द्रौपदी राजेंद्र, काळे महादेव साहेबराव, फुले दीपक सुभाष, खिलारे द्रौपदी राजेंद्र, पाटील राहुल शहाजी, बनकर शालन ईश्वर, खिलारे गिरीजा सचिन, मुलाणी महारूनबी इब्राहिम, खिलारे गिरीजा सचिन, खिलारे सचिन विजय, किर्दक सचिन मोहन, बनकर शालन ईश्वर, साळवे धीरज कैलास असे उमेदवार उभे आहेत.
थेट जनतेतील सरपंच पदासाठी कमल धन्यकुमार खिलारे उभ्या असून त्यांचे ग्रामपंचायत सदस्य उभे नाहीत. तर काही अपक्ष ग्रामपंचायत सदस्य निवडणूक रिंगणात उभे आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
I enjoyed the humor in this piece! For more, visit: FIND OUT MORE. Let’s chat about it!