माळशिरस पंचायत समितीच्या प्रभारी गटविकास अधिकारी पदी मनोज राऊत यांची नियुक्ती…..
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. विनायक गुळवे सेवानिवृत्त झाल्यानंतर करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज बापूराव राऊत यांच्याकडे माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पदाचा प्रभारी पदभार जिल्हा परिषदेकडून सुपूर्त करण्यात आलेला आहे. माळशिरस पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी पदभार स्वीकारून प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात केलेली आहे.
करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज बापूराव राऊत यांचे मूळ गाव करमाळा तालुक्यातील घोटी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून 2014 साली त्यांची चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुरुवातीस नेमणूक झाली. त्यानंतर त्यांनी बुलढाणा, लातूर जिल्ह्यात काम केलेले आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी पदावर कार्यरत आहेत. प्रशासनावर वचक व कार्याची पद्धत, जनता व अधिकारी यांचा समन्वय असणारे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी मनोज बापूराव राऊत यांच्याकडे माळशिरस पंचायत समितीचा प्रभारी पदभार देण्यात आलेला आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.