दहिगाव जिल्हा परिषद गटात श्रीलेखा पाटील यांच्या दौऱ्याने गट व गण ढवळून निघाला..

दहिगाव जिल्हा परिषद गट सौ. संस्कृती राम सातपुते व दहिगाव पंचायत समिती गण सौ. तनुजा बाळू खिलारे यांच्या प्रचारार्थ श्रीराम शिक्षण संस्थेच्या सचिव व माळशिरस पंचायत समितीच्या माजी सदस्या श्रीलेखा प्रकाशराव पाटील यांच्या दमदार एन्ट्रीने झंजावाती दौरा…
दहिगाव (बारामती झटका)
श्रीराम शिक्षण संस्था पानिव सचिव तथा माळशिरस पंचायत समितीच्या माजी सदस्या सौ. श्रीलेखा प्रकाशराव पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या दहिगाव जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार सौ. संस्कृती राम सातपुते व दहिगाव पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार सौ. तनुजा बाळू खिलारे यांच्या प्रचारार्थ दहिगाव पंचक्रोशीतील वाड्या वस्तीवर दमदार एन्ट्री करून झंजावाती दौरा केलेला आहे. दहिगाव जिल्हा परिषद गट व गण ढवळून निघालेला आहे.
दहिगाव पंचक्रोशीमध्ये कदम वस्ती, शेरे वस्ती, नाकुरे वस्ती अशा अनेक ठिकाणी भेटीगाठी घेऊन मतदारांना भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी शिवप्रसाद वुमन अर्बन बँकेच्या चेअरमन तथा सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ऋतुजा शरदराव मोरे, संस्कृती सातपुते, तनुजा खिलारे, स्वाती पाटील, सत्यशील पाटील, कैलास सस्ते, यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स्वामी समर्थ मंदिरामध्ये मानाची महाआरती करण्यात आली.

दहिगावमध्ये मोरे, पाटील त्यांच्या समवेत माळशिरस तालुक्याचे स्वाभिमानी नेतृत्व व धडाडीचे आमदार स्वर्गीय शामराव पाटील यांच्या सुनबाई श्रीलेखा पाटील यांची दहिगाव गावात दमदार एन्ट्री झाल्याने दहिगाव जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण ढवळून निघालेला आहे..
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



