ताज्या बातम्याराजकारण

देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची महायुतीचे उमेदवार खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ माळशिरस येथे जाहीर सभा होणार…

माळशिरस (बारामती झटका)

देशाच्या चौदाव्या लोकसभेचे निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागलेले आहे. निवडणुकीच्या रणधमाळ्या सुरू झालेल्या आहेत. देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची महायुतीचे अधिकृत उमेदवार माढा लोकसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ मंगळवार दि. 30/04/2024 रोजी माळशिरस शहरानजीक पुणे-पंढरपूर रोडवर, कृषी कार्यालयाच्या जवळ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माळशिरस येथील जाहीर सभेच्या अनुषंगाने गुप्तवार्ता विभाग सोलापूर उपअधीक्षक गायकवाड साहेब यांनी सभेचे ठिकाण, हेलिपॅड व इतर ठिकाणांची पाहणी केलेली आहे. माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे विशेष निमंत्रित सदस्य डॉक्टर आप्पासाहेब देशमुख यांनी उपअधीक्षक गायकवाड यांचा सन्मान केला आहे.

माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी मतदारसंघामध्ये अनेक प्रलंबित प्रश्न सोडवून भारतीय जनता पक्षाची प्रतिमा उंचावलेली असल्याने महायुतीकडून उमेदवारी दुसऱ्याच यादीत जाहीर झालेली आहे. प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची जाहीर सभा माळशिरस येथे होत आहे. त्यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांचे नेते व राज्यातील आजी माजी लोकप्रतिनिधी यांच्या मोठ्या उपस्थितीत जाहीर सभा संपन्न होणार आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button