ताज्या बातम्याराजकारण

माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा विजय निश्चित….

माळशिरसकरांचे लीड माढा करमाळाकर संपवणार तर, पंढरपूर, सांगोला, फलटण, माण-खटाव लाखावर शेंडी लावणार….

माळशिरस (बारामती झटका)

देशाच्या 19 व्या लोकसभेच्या निवडणुकीत देशात व राज्यात चर्चेत ठरलेल्या माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचा पराभव करून माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा विजय निश्चित आहे, असा मतदारांमधून सूर येत आहे. तर राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे.

माढा लोकसभा मतदार संघात सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा, सांगोला, माळशिरस मतदारसंघासह पंढरपूर तालुक्यातील काही गावे व सातारा जिल्ह्यातील माण खटाव व फलटण मतदार संघासह सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यातील गावांचा समावेश आहे. माढा लोकसभेसाठी 32 उमेदवार आपले नशीब आजमावत असले तरी खरी लढत महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील या दोन उमेदवारांमध्ये लढत असल्याचे चित्र मतदार संघात दिसत आहे.

महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील माळशिरस विधानसभा मतदार संघातील आहेत. या मतदारसंघात कायम मोहिते पाटील व पारंपारिक मोहिते पाटील विरोधी गट यांच्यामध्ये मतदानाची विभागणी होत असते मात्र, या वेळेला मोहिते पाटील यांच्या समवेत पारंपारिक मोहिते पाटील विरोधी गटातील नेते व कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत. मोहिते पाटील पारंपरिक विरोधी गटातील काही नेते व कार्यकर्ते यांना सदरचा निर्णय पसंत नसल्याने महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी ठाम उभे राहिलेले आहेत. असे जरी असले तरीसुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना माळशिरसकरांचे किती का असेना परंतु लीड मिळणार आहे. या लीडवर सोलापूर जिल्ह्यातील मोहिते पाटील विरोधी असणारे माढा विधानसभेचे आमदार बबनदादा शिंदे, करमाळा विधानसभेचे आमदार संजय मामा शिंदे या शिंदे बंधू सह माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी राज्यमंत्री स्वर्गीय दिगंबर बागल यांच्या कन्या रश्मीताई बागल, आरोग्यमंत्री नामदार तानाजी सावंत व शिवाजीराव सावंत यांच्यासह भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट, शिवसेना एकनाथराव शिंदे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, कवाडे गट, रयत क्रांती शेतकरी संघटना यांच्यासह अनेक सामाजिक, राजकीय संघटना सक्रिय झालेल्या असल्याने माळशिरसकरांचे लीड माढा करमाळाकर संपवणार आहेत. उर्वरित पंढरपूर विधानसभा तालुक्यातील गावांमधून माजी आमदार प्रशांत मालक परिचारक व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, संत शिरोमणी साखर कारखान्याचे कल्याणराव काळे, स्वेरीचे सचिव प्राध्यापक डॉ. पि. बी. रोंगे सर, सांगोला विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपकआबा साळुंखे पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब उर्फ चेतनसिंह केदार सावंत, माण खटाव चे कर्तव्यदक्ष व धाडसी आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर अशा अनेक ज्ञात अज्ञात दिग्गजांच्यामुळे पंढरपूर, सांगोला, माण खटाव मतदार संघासह फलटणचा भूमिपुत्र म्हणून फलटण मतदार संघातून विक्रमी मतदान मिळणार असल्याची चर्चा सुरू असल्याने लाखांच्यावर शेंडी लावणार, असा मतदारांचा होरा आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या सहकार्याने माढा लोकसभा मतदारसंघात गतवेळच्या निवडणुकीत जाहीरनाम्यामधील आश्वासने पूर्ण केलेली आहेत. काहींची पूर्णत्वाकडे वाटचाल आहे. त्यामध्ये सिंचन, रस्ते, रेल्वे असे विविध रखडलेल्या प्रकल्पांना चालना मिळालेली असल्याने मतदार व शेतकरी बांधव समाधानी आहेत. मोदी सरकार यांनी गोरगरीब जनतेला थेट लाभ दिलेले आहेत. त्यामध्ये मोफत रेशन, शंभर रुपयांमध्ये उज्वला गॅस, दुष्काळ निधी थेट शेतकऱ्याच्या खात्यावर, वयोवृद्धांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत. अनेक लोकांना विहिरीचा, घरकुलाचा लाभ मिळालेला आहे. हर घर नल योजना राबवून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचे काम सुरू आहे. देशाला सशक्त व बलवान बनविण्यासाठी कणखर असे नेतृत्व देशाला पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या रूपाने मिळालेले आहे. अशा सर्व गोष्टी सर्वसामान्य मतदार, शेतकरी बांधव व गोरगरीब जनता स्पष्टपणे बोलत असल्याने माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा विजय निश्चित मानला जात आहे. माळशिरसकरांचे लीड माढा करमाळाकर संपवणार तर पंढरपूर, सांगोला, माण खटाव लाखांवर शेंडी लावणार, असा निर्धार मतदारांनी केलेला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे. मतदान उद्या ७ मे रोजी आहे. प्रचार यंत्रणा थांबलेली आहे मात्र, मतदारांची चर्चा मात्र सुरू झालेली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort