धर्मपुरी गावचे प्रगतशील बागायतदार सुदाम संभाजी काटकर अनंतात विलीन…
भारतीय जनता पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष व विद्यमान उपाध्यक्ष धर्मपुरी गावचे माजी सरपंच बाजीराव काटकर यांना पितृषोक…..
पाणीदार खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी आबांचे अंतिम दर्शन घेऊन काटकर परिवारांचे सांत्वन केले…
धर्मपुरी (बारामती झटका)
धर्मपुरी ता. माळशिरस, गावचे प्रगतशील बागायतदार सुदाम संभाजी काटकर यांचे रविवार दि. 05/01/2025 रोजी अल्पशा आजाराने वयाच्या 79 वर्षी दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. भारतीय जनता पक्षाचे माळशिरस तालुका माजी अध्यक्ष व सोलापूर जिल्हा विद्यमान उपाध्यक्ष व धर्मपुरी गावचे आदर्श माजी सरपंच बाजीराव काटकर यांचे वडील होते.
माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी स्वर्गीय सुदाम काटकर उर्फ आबांच्या पार्थिव देहाचे अंतिम दर्शन घेतले. पुष्पहार अर्पण करून काटकर परिवारांचे सांत्वन केलेले होते.
स्वर्गीय सुदाम काटकर उर्फ आबा सांप्रदायिक होते. त्यांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असल्याने धर्मपुरी परिसरातील सांप्रदायिक मंडळी यांनी हरिनामाच्या जयघोषामध्ये अंत्ययात्रा निघालेली होती. धर्मपुरी-शिंदेवाडी रोड येथील काटकर वस्ती, निवासस्थानाशेजारील शेतामध्ये सकाळी 10.30 वाजता अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांचा अतिशय सोज्वळ व सुसंस्कृत स्वभाव होता. त्यांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार केलेले आहेत. मुलांनीही आपल्या उद्योग व्यवसायात व शेतीमध्ये प्रगती केलेली आहे.
धनराज हॉटेल हे सर्व परिचित आहे. शेती व उद्योग व्यवसायाबरोबर राजकारणात काटकर परिवार असल्याने धर्मपुरी पंचक्रोशीसह काटकर परिवारांचे नातेवाईक, मित्रपरिवार व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांचा रक्षा विसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम मंगळवार दि. 07/01/2025 रोजी सकाळी 08 वाजता होणार आहे. स्वर्गीय आबांच्या आत्म्यास शांती लाभो व काटकर परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो हीच बारामती झटका परिवार यांच्याकडून भावपूर्ण आदरांजली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.