धर्मवीर सदाशिवराव माने पाटील ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली….

सदाशिवनगर ( बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील धर्मवीर सदाशिवराव माने पाटील ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, सदाशिवनगर या पतसंस्थेची 33 वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दि. 29/09/2023 रोजी सकाळी 11 वाजता शिवामृत भवन, सदाशिवनगर येथे उत्साही व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
वार्षिक सर्वसाधारण सभेची सुरुवात सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, राजमाता रत्नप्रभादेवी मोहिते पाटील, धर्मवीर सदाशिवराव माने पाटील, लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील, नामदेवराव सालगुडे पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रतिमा पूजन केल्यानंतर अहवाल सालात जे थोर नेते, संशोधक, शास्त्रज्ञ, राजकीय कार्यकर्ते, कलावंत, शिक्षण तज्ञ, सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते, कवयित्री, जवान व संस्थेचे सभासद आणि सभासदांचे नातेवाईक दिवंगत झालेले आहेत, यांच्या स्मृतींना अभिवादन करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यामध्ये श्रीमती लीलावती सदाशिवराव माने पाटील यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक तज्ञ संचालक बाबासाहेब जयवंतराव सावंत उर्फ सावंतात्या यांनी केले. सर्वसाधारण विषयाचे वाचन संस्थेचे सचिव श्री. विष्णू पवार साहेब यांनी केले. सर्व विषय उपस्थित सभासद संचालक यांनी बहुमताने मंजूर केले. सदरच्या विषयांवर पोपटदादा गरगडे व विलास अद्रट यांनी मनोगत व्यक्त केले.
संस्थेचे चेअरमन तथा वार्षिक सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष श्री. प्रतापबापू सालगुडे पाटील यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित संचालक मंडळ व सभासदांचे स्वागत करून संस्थेचा वार्षिक अहवाल, ताळेबंद पत्र, नफा, तोटा पत्रक सादर करीत असताना संस्थेने लक्षणीय प्रगती केलेली आहे हे आपणास माहिती व तुलनात्मक आकडेवारीवरून दिसून येत असल्याचे सांगितले. पतसंस्था 13 मार्च 1990 साली स्थापन झालेली आहे. संस्थेने सदाशिवनगर व आसपासच्या गावांना मालकारण, वाहन तारण, नाममात्र सभासद पीक कर्ज, छोटे-मोठे व्यवसायिक यांना आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कर्ज पुरवठा केला आहे. संस्थेचे सभासद 1446 आहेत. संस्थेचे भाग भांडवल 99 लाख 99 हजार 200 इतके असून ठेवी 10 कोटी 36 लाख 89 हजार 418 आहेत. चालू वर्षात 01 कोटी 36 लाख 27 हजार 212 एवढी वाढ झालेली आहे. त्यामुळे कर्ज वाटप 09 कोटी 36 लाख 08 हजार हजार 042 रुपये एवढे केलेले आहे. चालू वर्षी 08 लाख 11 हजार 263 रुपये नफा झालेला आहे. 25 टक्के प्रमाणे राखीव निधी वर्ग व शिल्लक नफ्यावर 5% टक्के प्रमाणे लाभांश निघत आहे. तरी थकीत सभासदांनी आपले हप्ते व व्याज भरून वसुली बाबत सहकार्य करण्याची संस्थेचे चेअरमन प्रतापबापू सालगुडे पाटील यांनी अपेक्षा व्यक्त केली.
धर्मवीर सदाशिवराव माने पाटील ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, सदाशिवनगर या संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील संस्थापक आहेत. महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील आधारस्तंभ आहेत तर स्वर्गीय नामदेवराव नारायणराव सालगुडे पाटील यांचा आशीर्वाद असणाऱ्या संस्थेचे सन 2022 – 23 संचालक मंडळ, चेअरमन प्रताप नामदेवराव सालगुडे पाटील, व्हाईस चेअरमन प्रशांत जंबुकुमार दोशी, संचालक शौकत इमाम मुलाणी, राजेंद्र उत्तम पवार, पोपट जगन्नाथ शेंडे, तानाजी भगवान भांगे, शहाजी सोपान ओवाळ, मारुती बाबा सरक, डॉ. विजयसिंह शिवाजीराव भगत, तज्ञ संचालक बाबासो जयवंत सावंत, सोपान भगवान जाधव, संचालिका सौ. रतन आप्पा भुजबळ, सौ. नयना सुनील दाभाडे असे संचालक मंडळ आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य जयवंतराव पालवे पाटील, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक अर्जुनराव धाईंजे, भाजपचे ज्येष्ठ नेते हनुमंतराव पाटील, माजी सरपंच नागनाथ ओवाळ, पुरंदावडे गावचे ज्येष्ठ नेते माजी उपसरपंच पोपटदादा गरगडे, ज्येष्ठ नेते वसंतराव ढगे, पुरंदावडे गावचे माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच बाळासाहेब उर्फ देविदास ढोपे, तुकाराम चव्हाण, शौकत मुलाणी आदी मान्यवरांसह संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री. विजय निंबाळकर सर यांनी केलेले होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng