ताज्या बातम्याशहरसामाजिक

महाळुंग-श्रीपुर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा लक्ष्मी चव्हाण यांचे सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आणि उत्पादन शुल्क विभाग सोलापूरचे अधीक्षक यांना पत्र

रीतसर पत्र देऊन दारूबंदीची मागणी करूनही कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे पुनश्च पत्र व्यवहार

महाळुंग (बारामती झटका)

महाळुंग-श्रीपूर (ता. माळशिरस) नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सौ. लक्ष्मी अशोकराव चव्हाण यांनी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूरचे अधीक्षक यांना दि. २०/८/२०२३ रोजी समस्त नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये सभागृहात गावातील व्यसनाधीनता संपवण्यासाठी संपूर्ण गाव दारू बंद करण्यासाठी ठराव करून घेतला व त्यानुसार दिनांक २६ ऑगस्ट २०२३ रोजी आपल्या दुय्यम राज्य उत्पादन शुल्क कार्यालय अकलूज व अकलूज पोलीस स्टेशन यांच्याकडे रीतसर पत्र देऊन दारूबंदीची मागणी केली. मात्र, त्यांच्याकडून कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे पुनश्च पत्रव्यवहार करून मागणी करण्यात आली आहे.

सदर पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, महाळुंग-श्रीपुर नगरपंचायतीच्या वतीने गावातील बेरोजगार तरुण व्यसनाधीन होत असल्यामुळे, तसेच मृत्यूचा आकडा व्यसनांमुळे वाढत असल्यामुळे दारू, ताडी, गुटखा, खर्रा, आदी व्यसने बंद व्हावी, त्यासाठी नगरपंचायतीच्या सभागृहामध्ये एकमताने ठराव करून याबाबतीत अकलूज येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाकडे तसेच अकलूज पोलीस स्टेशन यांच्याकडे रीतसर पत्र दि. २६ ऑगस्ट २०२३ रोजी सादर केले. मात्र, अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही तसेच दारू, ताडी, मटका, ऑनलाईन मटका, जुगार, खर्रा या विक्रेत्यांमध्ये कोणतीही कमतरता/अटकाव विक्रीमध्ये न झाल्यामुळे आपल्या कार्यालयात सदरचे पत्र देऊन विनंती करण्यात येत आहे.

आपण जिल्ह्याच्या वतीने आमच्या तालुक्यासाठी एक स्पेशल फोर्स टीम केवळ दारू धंदे पकडून त्यांच्यावर कार्यवाही करण्याकामी व ज्यांच्यावर गुटका व दारूचे आरोप आहेत अशा सराईत विक्रेत्यांना तात्काळ तडीपार करावी, या मागणी करता सदरचे निवेदन देत आहोत.

तरी दि. १५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत सदरची कार्यवाही प्रामाणिकपणे निपक्ष:पणे पार होऊन, सदर अवैध व्यवसाय करणारे सर्व सराईत विक्रेते यांच्यावर तडीपारची कारवाई न झाल्यास दि. १६ ऑक्टोबर २०२३ रोजी आपल्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यास आम्ही, गावातील त्रस्त महिला, पीडित महिला व सर्व नगरसेवक येऊन बसणार आहोत. याची गंभीरपूर्वक दखल घेऊन लवकरात लवकर उचित कार्यवाही करून या व्यसनांना आमच्या गावातून हद्दपार करावे. तसेच निष्क्रिय अधिकाऱ्यांना सुद्धा येथून हद्दपार करावे व काम करणारे अधिकारी पाठवून आपल्याच विभागाचा महसूल वाढवावा अशी विनंती देखील या पत्रात करण्यात आली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button