धायतोंडे वस्ती ते रायगाव रोड कुकडीची चारी दुरुस्त करण्याची मागणी
करमाळा (बारामती झटका)
धायतोंडे ते रायगाव रोड या एक किलोमीटर अंतरावरील कुकडीच्या कॅनलमध्ये गेली पंचवीस वर्षांपासून एक थेंब सुद्धा पाणी आलेले नाही. या भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी या कॅनलमधली दुरुस्ती करावी, अशी मागणी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष रमेश कांबळे व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केली आहे.
या कॅनलमध्ये मोठ्या प्रमाणावर झाडी वाढलेले आहे, या कॅनलचा दरवाजा अज्ञात व्यक्तीने चोरून नेला आहे, या कॅनलमध्ये पाणी आले तर या भागातील जवळपास एक हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येऊन या भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. परंतु, कुकडीचे अधिकारी जाणीवपूर्वक या कॅनल दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत आहेत.
येणाऱ्या मार्च महिन्यातील आवर्तनापूर्वी या कॅनॉलची दुरुस्ती करावी या भागातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे. सदर निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी सोलापूर यांना पाठवण्यात आलेल्या आहेत.
त्या निवेदनावर राजू शेठ परदेशी, ईश्वर मोहिते, राजेंद्र मिरगळ, मनोहर साळुंखे, श्रीराम रेगुडे, संभाजी साळुंखे, सुनील कांबळे, हरिभाऊ मोरे, अतिक भाई डबेवाले, यादव सर, महादेव मोरे यांच्या स्वाक्षरी आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Great article! I loved the humor you infused into the topic. For a deeper dive, check out this link: EXPLORE NOW. What do you think?