ज्ञानसेतू अभ्यासिकेला दादासाहेब हुलगे यांनी दिली स्पर्धा परीक्षेची पुस्तके भेट…
“बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले” या म्हणीचा प्रत्यय सामाजिक कार्यातून आलेला आहे…
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील आयएएस, आयपीएस, आयआरएस, आयएफएस केंद्रीय सेवेतील अधिकारी आणि राज्यसेवेतील अधिकारी यांनी एकत्र येऊन माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठान स्थापन केले. प्रतिष्ठानचे मार्गदर्शक प्रेरणास्थान पालघर जिल्हा पोलिस अधिक्षक बाळासाहेब वाघमोडे पाटील हे आहेत. प्रतिष्ठानच्या माध्यमातून माळशिरस तालुक्यातील गरजू व होतकरू विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षेची तयारी करावयची आहे. अशा गरजू विद्यार्थ्यांना ज्ञानसेतू अभ्यासिका माळशिरस शाखा क्र. १ व ज्ञानसेतू अभ्यासिका अकलूज शाखा क्र. २ या दोन्ही शाखांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन व पुस्तके दिली जातात. राज्यात आदर्शवत असे काम माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठान करत आहे.प्रतिष्ठानच्या अकलूज येथील दुसऱ्या शाखेच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी आपणही काही तरी समाजाचे देणे लागतो हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून संघर्षयात्री प्रा. दादासाहेब हुलगे यांनी ज्ञानसेतू अभ्यासिकेला पाच हजार रुपयांची पुस्तके देण्याचे घोषित केले होते.
“बोले तैसा चाले, त्याची वंदांवी पावले” या म्हणीप्रमाणे दादासाहेब हुलगे यांनी गणरायाच्या आगमनाच्या शुभ मुहर्तावर प्रतिष्ठानचे मार्गदर्शक मुंबई मंत्रालयातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अव्वर सचिव गणेश कचरे साहेब, अकलूज सार्वजनिक बांधकाम विभागाचे उत्कृष्ट शाखा अभियंता गोविंद कर्णवर पाटील, प्रतिष्ठानचे सहसचिव ग्रामविकास अधिकारी हनुमंत वगरे यांच्याकडे दादासाहेब हुलगे यांनी स्पर्धा परीक्षेची पाच हजारापेक्षा जास्त किंमतीची पुस्तके सुपुर्द केली. त्यावेळी त्यांच्यासमवेत मच्छिंद्र गोरड सर, आबा पिंगळे सर, शशांक कचरे, मोहन गोरड आदी मान्यवर उपस्थित होते.
अल्पावधीतच प्रतिष्ठानचे अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यश संपादन करुन प्रतिष्ठानचे नाव उंचावत आहेत. प्रतिष्ठानचे अध्यक्ष सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ कर्णवर पाटील, प्रतिष्ठानचे सचिव समाज कल्याण अधिकारी सुनिल कर्चे, प्रतिष्ठानचे सहसचिव ग्रामविकास अधिकारी हनुमंत वगरे व त्यांच्या सर्व पदाधिकारी आणि प्रतिष्ठानचे सर्व सदस्य यांच्या नियोजनातून व मार्गदर्शनातून प्रतिष्ठानचे नाव उंचावत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng