ताज्या बातम्यामनोरंजन

‘शॉर्ट अँड स्वीट’ सिनेमाच्या पोस्टर प्रदर्शनानंतर चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली

‘शॉर्ट अँड स्वीट ‘चे पहिले पोस्टर प्रदर्शित

माळशिरस (बारामती झटका)

गणेश कदम दिग्दर्शित ‘शॉर्ट अँड स्वीट’ चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रकाशित करण्यात आले. ३ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात एका बुटक्या व्यक्तीची कथा संवेदनशीलपणे रेखाटण्यात आली असून, या पहिल्या पोस्टरमध्ये ही बाब अत्यंत ठळकपणे अधोरेखित होते. या पोस्टरच्या प्रदर्शनानंतर या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

सोनाली कुलकर्णी, श्रीधर वत्सर, हर्षद अटकरी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या या पोस्टरमध्ये हे कलाकार दिसत आहेत. त्यातील नायक श्रीधर वत्सर एका टेबलावर उभा राहून सोनाली कुलकर्णीच्या गालाजवळ आपले ओठ नेतो असे या पोस्टरमध्ये दिसते. दृश्यातून चित्रपट रंजक आणि वेगळ्या धाटणीचा आहे, हे अधोरेखित होते.

त्यामुळे या चित्रपटाची चर्चा चित्रपट रसिक आणि चित्रपट क्षेत्रामध्ये सुरू झाली आहे. ‘शॉर्ट अँड स्वीट’ ही एक संपूर्णतः कौटुंबिक कथा आहे. ही कथा एका अनपेक्षित आणि अनोख्या अशा कौटुंबिक कथेवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये ओमकार भोजने, रसिका सुनील, तुषार खैर, अजित भुरे आदींच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे सादरीकरण शुभम प्रॉडक्शनचे असून, निर्मिती पायल गणेश कदम आणि विनोद राव यांची आहे. हा चित्रपट ३ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort