डॉ. सर्जेराव दोलतडे यांना राष्ट्रपती भवनातून २६ जानेवारीच्या कार्यक्रमाचे विशेष निमंत्रण.

डॉ. सर्जेराव दोलतोडे यांनी माळशिरस तालुक्याची मान उंचावली, दिल्लीच्या तक्त्यावर ग्रामीण भागातील तरुणाचा सन्मान अभिमानाची गोष्ट….
माळशिरस (बारामती झटका)
विविध क्षेत्रातील मान्यवरांना दरवर्षी राष्ट्रपती त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणुन २६ जानेवारीला राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमाला बोलवून गौरव करतात. या वर्षी प्रिन्सिपल सायंटिफिक Advisory कमिटी, भारत सरकार यांच्याकडून तरुण शास्त्रज्ञ डॉ. सर्जेराव बापू दोलतडे यांचे नाव राष्ट्रपतींना Recommend करण्यात आले होते. डॉ. सर्जेराव यांनी घाण पाणी शुद्ध करण्याची नवीन टेक्नॉलॉजी शोधून ती भारतातील ४ राज्यात (महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगाना आणि आंध्रप्रदेश) यशस्वीपणे बसवली आहे. तसेच आतापर्यंतचे आपले पूर्ण आयुष्य त्यांनी संशोधनामध्ये घातले आहे. आत्तापर्यंतच्या प्रवासात त्यांनी दोनवेळा भारत देशाचे प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय पातळीवर केले असून सध्याचा त्यांचा सन्मान हा अजून ऊर्जा देणारा आहे.
डॉ. सर्जेराव सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील झंजेवाडी खुडूस गावचे रहिवासी आहेत. त्यांचा हा एकुण प्रवास ग्रामीण भागातील तरुणांना प्रेरणा दायक आहे. या त्यांच्या सन्मानाबद्दल भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार रामभाऊ सातपुते साहेबांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील कामास शुभेच्छा दिल्या.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.