डोंबाळवाडी (कुरभावी) येथे रंगणार श्री संत बाळूमामा यांचा भव्य भंडारा उत्सव
कुरभावी (बारामती झटका)
श्री संत सद्गुरू बाळुमामा यांच्या मासिक भंडाऱ्याच्या द्वितीय वर्धापन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन श्री बाळूमामा तरुण मंडळ डोंबाळवाडी (कु.) यांनी केले आहे. यानिमित्त भव्य कीर्तन महोत्सव साजरा होत आहे. मंगळवार दि. ९ जानेवारी पासून सुरु होणाऱ्या या सोहळ्यात दि. ९ जानेवारी रोजी ह. भ. प. शिवलीलाताई पाटील बार्शी, दि. १० जानेवारी रोजी ह. भ. प. छगन महाराज खडके शिर्डी, दि. ११ जानेवारी रोजी ह. भ. प. प्रकाश महाराज साठे, दि. १२ जानेवारी रोजी ह. भ. प. अमोल सूळ महाराज यांचे काल्याची कीर्तन सेवा होईल.
डोंबाळवाडी व परिसरात या कार्यक्रमाचे भव्य दिव्य नियोजन होत असून सर्व लोकांना या कार्यक्रमाची उत्सुकता लागली आहे. १५ दिवसांपासून या कार्यक्रमाची तयारी सुरु असून सर्व तरुण मोठ्या उत्साहात पडेल ती सेवा करताना दिसून येत आहेत. गेल्यावर्षी प्रमाणेच सुंदर व देखणा मंडप महालक्ष्मी मंडप व डेकोरेशन उंबरे (द.) यांनी साकारला आहे.
या दरम्यान दररोज संत बाळूमामाची आरती व महाप्रसाद आयोजित केला आहे. यासाठी श्री. दादासो सूर्यवंशी, श्री. तानाजी शिवाजी रुपनवर, श्री. अण्णाजी रुपनवर, श्री. रामहरी विठोबा रुपनवर आणि श्री. पांडुरंग बाळकु रुपनवर यांची अन्नदान सेवा आहे. हा संपूर्ण कार्यक्रम ओम साई क्रियेशन या युट्यूब चॅनेल वर प्रदर्शीत केला जाणार आहे. त्याच बरोबर पिण्यांच्या पाण्याचे नियोजन श्री. नाथासो गेनबा रुपनवर यांच्या तर्फे केले जाणार आहे. श्री. बाळूमामा तरुण मंडळ डोंबाळवाडी यांच्यावतीने प्रत्येक अमावस्येला बाळूमामांचा भंडारा आयोजित केला जातो. त्यानिमित्त कीर्तन, आरती, महाप्रसादाचे नियोजन असते.
बाळूमामाचे मंदिर नसताना एवढा मोठा सोहळा फक्त डोंबाळवाडीमध्येच केला जातो. यामुळे या सोहळ्याला विशेष महत्व आहे. शुक्रवारी बाळूमामाची भव्य मिरवणूक निघणार आहे. या सर्व सोहळ्याला ह. भ. प. गोरख महाराज कुंभार, ह. भ. प. धनंजय महाराज कदम, ह. भ. प. सागर बोराटे महाराज व ह. भ. प. अमोल महाराज सूळ यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या सोहळ्याला सर्व खेळण्यांची दुकाने व मनोरंजक खेळाची दुकाने आल्यामुळे यात्रेचे स्वरूप आले आहे. तरी परिसरातील सर्वांनी या सोहळ्यासाठी उपस्थित राहुन सहकार्य करावे. असे आवाहन श्री बाळूमामा तरुण मंडळाने केले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.