डोणगाव येथील के. टी. जी. आमले प्रशालेत सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा उपक्रम संपन्न
डोणगाव (बारामती झटका)
डोणगाव येथील के. टी. जी. आमले प्रशालेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील संगणक शास्त्र संकुल व पुणे येथील क्विक हिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामध्ये संगणक शास्त्र संकुलातील सुप्रिया शिंदे व शकुंतला बेळळे या विद्यार्थिनींनी “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा” या विषयावर सेमिनार दिले.
या सेमिनारमध्ये त्यांनी आजच्या ऑनलाइन युगामध्ये होणाऱ्या विविध प्रकारच्या फसवणुकीबद्दल महिती दिली. अशा प्रकारच्या फसवणुकी होऊ नये म्हणून त्याबद्दल सर्वांनी काळजी घेण्याविषयी सविस्तर माहिती दिली. OTP कोणास सांगू नये, अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉलची पडताळणी करून घेणे, पासवर्ड स्ट्राँग वापरून आपली माहिती सुरक्षित करावी तसेच आपली महिती ही आपली जबाबदारी आहे असे सांगितले.
मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप इत्यादी साधनांवर अधिकृत अँटीव्हायरस चा वापर करावा. या कार्यक्रमास एकूण २२२ विद्यार्थी व प्रशालेतील सर्व शिक्षक उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाबर सर यांचे मार्गदर्शन लाभले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
JNT303: Bocoran & Prediksi Keluaran Ekor HK Malam Ini Toto Online 4D Paling Jitu
sumatra slim belly tonic reviews: sumatra slim belly tonic reviews
sumatra slim belly tonic reviews: sumatra slim belly tonic reviews