गोरडवाडीच्या स्नुषा सौ. पुनम शेंडगे (गोरड) यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
जय विजय शिक्षक पतसंस्थेच्या वतीने सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील आदर्श शिक्षक पुरस्काराने शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते सन्मानित
माळशिरस (बारामती झटका)
शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल जय विजय शिक्षक पतसंस्थेच्यावतीने देण्यात येणारा ‘सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार’ या वर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिरळे येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका गोरडवाडी गावच्या स्नुषा सौ. पूनम पोपट शेंडगे (गोरड) यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. अनेक अडचणींवर मात करून ज्ञानदानाचे पवित्र कार्य अखंड व अविरतपणे करणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वास त्यांच्या शैक्षणिक कार्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते कृष्णप्रिया मंगल कार्यालय येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मणराव पवार, जय विजय पतसंस्थेचे संस्थापक सुभाष मिसाळ, चेअरमन कविता काशिनाथ शेळके, व्हाईस चेअरमन सोमनाथ मारुती मिसाळ, जिल्हा सोसायटीचे संचालक विठ्ठलराव काळे, आदर्श शिक्षक जगन्नाथ गोरड व संचालक मंडळासह सभासद व तालुक्यातील सर्व शिक्षक उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
What a fantastic read! The humor made it even better. For further details, check out: READ MORE. Any thoughts?