डॉ. योगेशदत्त जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सातासमुद्रापार रोवला झेंडा…
आनंदनगर (बारामती झटका)
रत्नाई कृषी महाविद्यालय, आनंदनगर, अकलूज ता. माळशिरस येथील चार विद्यार्थ्यांची गतवर्षीप्रमाणे लंडन, युके व अमेरिका येथे पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड झाली आहे. आजपर्यंतची उल्लेखनीय बाब म्हणजे रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या अकरा विद्यार्थ्यांनी जगप्रसिद्ध असलेल्या लंडन, युके, युएसए, रशिया, नेदरलँड व ऑस्ट्रेलियाच्या कृषी विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेऊन या कॉलेजचे नाव उज्वल केले आहे.
रत्नाई कृषी महाविद्यालयातील श्री. शुभम राठोड याचे रॉयल ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटी, लंडन, श्री. रितिक ठाकूर याचे ॲग्रीकल्चर यूनिवर्सिटी, सिरेनसिस्टर, यु.के., श्री. रेहमान मोहम्मद यांचे इलिनॉईस युनिव्हर्सिटी, यूएसए व श्री. साई विशाल वर्मा यांचे टिसाईड युनिव्हर्सिटी, मिडलेशब्रो, युके येथे पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश झाला आहे. या सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे स्वप्नपूर्ण करण्यासाठी डॉ. योगेशदत्त जाधव यांचे प्रमुख मार्गदर्शन आणि डॉ. रणजीतसिंह निंबाळकर, डॉ. दादासाहेब ठवरे, डॉ. बंडोपंत शिंदे व डॉ. शैलेंद्र माने यांचे सहाय्यक मार्गदर्शक म्हणून लाभ झाला.
या सर्व विद्यार्थ्यांचे रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे सभापती मा. श्री. जयसिंह मोहिते पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. संग्रामसिंह मोहिते पाटील, कार्यकारी सदस्या मा. कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील, सचिव मा. अभिजीत रणवरे, सहसचिव मा. हर्षवर्धन खराडे पाटील, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व प्राचार्य यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले व त्यांच्या भावी शैक्षणिक प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng