ताज्या बातम्याराजकारण

उत्तमराव जानकर जनतेचे आमदार तर, धैर्यशील मोहिते पाटील कार्यकर्त्यांचे खासदार..

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांनी माळशिरस विधानसभेची निवडणूक लढवून अल्पशा मताने पराभव झालेला आहे. त्यामुळे कार्यकर्ते जनतेच्या मनातील आमदार म्हणून जनतेचे आमदार अनेक ठिकाणी ऐकावयास मिळत आहे तर, माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी खासदारकी लढवलेली नाही. कार्यकर्त्यांमधून माढा लोकसभेची निवडणूक लढवावी, यासाठी कार्यकर्ते खासदारच असे सोशल मीडियावर व्हायरल करीत आहेत. त्यामुळे सध्या तरी कार्यकर्त्यांचे खासदार अशी धैर्यशील मोहिते पाटील यांची माढा मतदार संघात नव्याने ओळख निर्माण झालेली आहे. राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांना जनतेचे आमदार तर भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांना कार्यकर्त्यांचे खासदार अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चेने वेग घेतलेला आहे.

राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांनी माळशिरस विधानसभेच्या निवडणुकीत एक लाखावर मतदान घेतलेले आहे. त्यामुळे जनतेने व मतदारांनी जनतेचे आमदार म्हणणे योग्य आहे. परंतु, भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी खासदारकीची निवडणूक लढविलेली नाही. सध्या माढा लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व मतदार संघातील विद्यमान लोकप्रतिनिधी कोणीही उमेदवारीसाठी आग्रही नाहीत. फक्त मोहिते पाटील गटाचे कार्यकर्ते धैर्यशील मोहिते पाटील खासदारच असे सोशल मीडियावर वातावरण निर्माण करून घरगुती कार्यक्रमांमध्ये भावी खासदार असा नामोल्लेख धैर्यशील मोहिते पाटील यांचा केला जातो. अशावेळी धैर्यशील मोहिते पाटील कार्यकर्त्यांचे खासदार अशी विरोधी गटामध्ये सध्या खुमासदार चर्चा सुरू आहे.

आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी विद्यमान पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनाच मिळणार असल्याचे भारतीय जनता पक्षाच्या व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ पातळीवरून बोलले जात आहे. येणारा काळच ठरवणार आहे जर निवडणुकीत उभाच राहता येणार नसेल तर खासदारच कसे म्हणायचे, असा विरोधी गटांमध्ये प्रश्न निर्माण होऊन टिंगल टवाळी सुरू आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button