एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी माळशिरस सकल धनगर समाजाचा भव्य रास्ता रोको….
धनगर समाज बांधवांचे पंढरपूर येथील आमरण उपोषण आंदोलनास समर्थन देण्यासाठी शेळ्या-मेंढ्यासह धनगर समाज बांधव रस्त्यावर उतरले…
माळशिरस (बारामती झटका)
धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी पंढरपुर येथे आमरण उपोषणाला बसलेल्या ६ समाज बांधवांना पाठींबा देण्यासाठी माळशिरस तालुका सकल धनगर समाजाच्यावतीने रास्ता रोको करून रस्त्यावर शेळ्या, मेंढ्या आणून ढोल-वाद्यांच्या गजरात सनईच्या मधुर सुरात भर उन्हात गजी ढोल खेळून आंदोलन करण्यात आले.
सकल धनगर समाज बांधव पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौक, ६१ फाटा, माळशिरस येथे रस्ता रोको आंदोलन मोठया प्रमाणात करण्यात आले. जुना पालखी मार्ग व नवीन बायपास पालखी महामार्ग एकत्र येतात, त्या ठिकाणी पालखी महामार्ग रोखून ठेवण्यात आला होता. धनगर समाज बांधवांनी रस्त्यावर शेळ्या, मेंढ्या आणलेल्या होत्या. भर उन्हामध्ये गजीढोल खेळ खेळला जात होता. समाजातील महिला, पुरुष, लहान मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी समाजाचे अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उत्तमराव जानकर, माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते गणपततात्या वाघमोडे, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर सुळ पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष सुरेशराव टेळे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष पांडुरंग वाघमोडे, खंडकरी शेतकऱ्यांचे नेते ॲड. सोमनाथ वाघमोडे, माळशिरसचे माजी उपनगराध्यक्ष डॉ. मारुतीराव पाटील, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अजीतभैय्या बोरकर, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, ज्येष्ठ नेते शामराव वाघमोडे, गोपाळ शिद सहकार महर्षी साखर कारखान्याचे संचालक शिवाजीराव शिद, नगराध्यक्ष ताई सचिन वावरे, माळशिरसचे माजी नगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख, नगरसेविका रेश्माताई टेळे, नगरसेवक महादेव कोळेकर, कैलास वामन, विजय देशमुख, अजिनाथ वळकुंदे, दादासाहेब शिंदे, रघुनाथ चव्हाण, संतोष वाघमोडे, माळशिरसचे पोलीस पाटील शितल पाटील, अहिल्यादेवी सोसायटीचे चेअरमन संदीप पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य तुकाराम देशमुख, डॉ. समीर बंडगर, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, पंचायत समितीचे माजी सदस्य माऊली पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने, भाजपा युवा मोर्चाचे माळशिरस तालुकाध्यक्ष शिवराज पुकळे, अहिल्यादेवी विकास सोसायटीचे संचालक मोहन टेळे, सचिन देशमुख, रमेश पाटील, विष्णूपंत नारनवर, ब्रह्मदेव डोंबाळे, बाजीराव माने, मारुती सिद यांच्यासह अनेक राजकीय पक्षांचे नेते मंडळी व समाजाचे सर्व समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते.
उपस्थित जनसमुदायास मारुती उर्फ आप्पासाहेब देशमुख, सौ. रेश्माताई टेळे, पांडुरंग वाघमोडे, सोमनाथ वाघमोडे, उत्तमराव जानकर यांनी मार्गदर्शन केले. एसटी धनगर आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, सरकारला लवकरात लवकर जाग आली नाही तर समाज याहीपेक्षा उग्र आंदोलन करेल, अशी भावनाही समाजाच्या नेते मंडळीकडून व्यक्त करण्यात आली.
माळशिरस तालुका सकल धनगर समाजाच्यावतीने रास्ता रोकोच्या मागण्याचे निवेदन माळशिरसचे तहसीलदार सुरेशराव शेजुळ साहेब यांनी स्वतः आंदोलन स्थळी येऊन स्वीकारले. माळशिरस पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता. यावेळी पोलीस समाज बांधवानी योग्य सहकार्य केले. मनसे तालुका अध्यक्ष सुरेशराव टेळे यांनी सर्वांचे आभार मानले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
ventolin pharmacy australia: Ventolin inhaler best price – ventolin 2
ventolin tablet price
ventolin cost in canada: Ventolin inhaler price – can you buy ventolin over the counter
medicine prednisone 5mg: prednisone tablets canada – generic prednisone 10mg
canada pharmacy: canadian pharmacy oxycodone – maple leaf pharmacy in canada
best online pharmacy india: indianpharmacy com – top online pharmacy india