ताज्या बातम्या

समाजाभिमुख, अष्टपैलू, आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे उपमुख्य अभियंता भीमराव काळे

भांब (बारामती झटका)

भांब गाव सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याच्या सरहद्दीवर सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूरच्या डोंगर कपारीमध्ये वसलेले गाव आहे. अतिशय दुर्गम परिसर, डोंगर कपारीने वेढलेले भांब गाव आहे. अशा गावामध्ये शेतकरी व मेंढपाळ असणारे रखमाबाई व संभाजी काळे या दाम्पत्यांच्या पोटी भीमराव काळे यांचा जन्म दि. 01/06/1967 साली झालेला आहे. संभाजी काळे यांना निवृत्ती, भीमराव, शिवाजी, किसन अशी चार मुले तर नमुक्ताबाई छगन रुपनवर फडतरी, कौसाबाई कोडलकर फोंडशिरस, कुसाबाई माने पळसमंडळ अशा तीन मुली होत्या.

संभाजी काळे यांची पूर्वीच्या काळी अतिशय प्रतिकूल व हलाखीची परिस्थिती होती. अशा कठीण व अडचणीच्या काळात भीमराव काळे यांनी पहिली ते चौथी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भांब येथे शिक्षण पूर्ण केले. पाचवी ते दहावी सदाशिवराव माने विद्यालय माणकी येथे शिक्षण पूर्ण केले. उर्वरित शासकीय विद्यानिकेतन अभियांत्रिकी कॉलेज कराड येथे डिप्लोमा पूर्ण केला. आणि 1987 साली वयाच्या विसाव्या वर्षी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण उर्फ म्हाडा मुंबई येथे कनिष्ठ अभियंता पदावर रुजू झाले. नोकरी करीत 2007 साली डिग्री प्राप्त केली, त्यामुळे त्यांना बढती मिळत गेली. त्यांनी कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, शाखा उप अभियंता, कार्यकारी अभियंता या पदावर काम केले असून सध्या म्हाडाच्या उपमुख्य अभियंता पदी कार्यरत आहेत.

श्री. भीमराव काळे यांचा विवाह लासुर्णे, ता. इंदापूर, जि. पुणे येथील सौ. भागीरथी व श्री‌. मारुती गोविंद वाडकर यांची कन्या शोभाताई यांच्याशी दि. 23/11/1989 रोजी झाला होता. सुसंस्कृत घराण्यातील शोभाताई यांनी भीमराव यांच्या सुखी संसाराला शोभा आणली. शहरी भागात राहून सुद्धा ग्रामीण भागाशी उभय पती-पत्नी यांनी कधीही नाळ तुटू दिलेली नाही. मित्रपरिवार व नातेवाईक यांच्या सुख-दुःखामध्ये पती-पत्नी नेहमी हजर असतात.
श्री. भीमराव काळे यांनी स्वतःची मुले तर इंजिनियर केलेली आहेतच. पण, ज्येष्ठ बंधू निवृत्ती यांचे दुःखद निधन झाले आहे, त्यांचीही दोन मुले व आपल्या परिवारातील शेतामध्ये काबाड कष्ट करणारे लहान बंधू शिवाजी यांचीही दोन मुले इंजिनियर केलेली आहेत. तर लहान बंधू किसन हे मुंबई पोलीस आहेत, त्यांची मुलेदेखील शिक्षण घेत आहेत.

भीमराव काळे यांचा मुलगा प्रज्वल व मुलगी वृषाली इंजिनीयर आहेत. सध्या वृषाली विवाहित आहे. मुलीचा विवाह ग्रामीण भागातील लोकांनी सिनेमांमध्ये पाहिलेला होता, तशाच पद्धतीने शाही विवाहसोहळा आपल्या कन्येचा सौ. शोभाताई आणि श्री. भीमराव काळे यांनी केलेला आहे.

भीमराव काळे यांनी मुंबई येथे नोकरी करीत असताना परिवारावर ज्याप्रमाणे लक्ष दिले, त्याचप्रमाणे आपण ज्या परिसरामध्ये वाढलो, खेळलो त्या परिसराला सुद्धा विसरले नाहीत. ग्रामदैवत संभाजी बाबा दरा परिसर विकसित करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. पूर्वीच्या काळी संभाजी बाबा दरा येथे मोठ्या प्रमाणात कुस्ती मैदान सुरू होते. मात्र, सदरचे मैदान गेली पस्तीस वर्ष बंद होते. गावातील सहकाऱ्यांच्या सहकार्याने 2017 पासून पुन्हा संभाजी बाबा येथील कुस्ती मैदान भीमराव काळे यांच्या प्रयत्नाने सुरू झाले आहे. भांब परिसरामध्ये सर्वच सार्वजनिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो. असे अष्टपैलू थोर व्यक्तिमत्व असलेले, भीमराव काळे यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort