ताज्या बातम्याराजकारण

फलटण येथील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या उद्घाटन कार्यक्रमाला रणजीतसिंह मोहिते पाटील उपस्थित राहतील का ?

महाविजय 2024 संयोजक श्रीकांतजी भारतीय यांच्या दीपावली स्नेह मेळावा कार्यक्रमाचा दौरा जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटील यांनी नियोजित दौरा सोशल मीडियावर जाहीर केला होता.

माळशिरस (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या शुभहस्ते माढा लोकसभा मतदार संघात विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन व भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे. भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील उपस्थित राहतील का ?, असा राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे असून सोशल मीडियावर रणजीतसिंह मोहिते पाटील यांचा नियोजित दौरा असल्याने फलटण येथील कार्यक्रमास उपस्थित राहणार नाहीत, असा मेसेज अद्यापपर्यंत सोशल मीडियावर आलेला नाही‌ त्यामुळे उपस्थित राहतील ? का नाही ?, अशी चर्चा सुरू आहेत.

भारतीय जनता पक्षाचे महाविजय 2024 संयोजक विधान परिषदेचे आमदार श्रीकांतजी भारतीय माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नातेपुते येथे कार्यक्रमाचे आयोजन माळशिरस तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आलेले होते. प्रोटोकॉल प्रमाणे पत्रिकेमध्ये नाव होते. त्याचवेळी आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी नियोजित दौरा असल्याने सदरच्या कार्यक्रमास उपस्थित राहणार नाही, तरी कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी, असा मेसेज देऊन सदरचा कार्यक्रम हाणून पाडण्याचा डाव टाकलेला होता.

मात्र, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर समर्थक व भारतीय जनता पक्षाने यशस्वी करून दाखवलेला होता.
फलटण येथील कार्यक्रमात आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे निमंत्रण पत्रिकेत प्रोटोकॉल प्रमाणे नाव आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस ज्यांच्यावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमास हजर न राहिल्यास वेगळा संदेश जाणार, यासाठी रणजीतसिंह मोहिते पाटील नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागलेले आहे.

राजकारणात असे बऱ्याच वेळा होते “धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय ” अशी अवस्था राजकीय लोकांची होत असते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button