फोंडशिरस येथील बाणलिंग वनराई फॉरेस्ट गट नं. ८२६ या क्षेत्राची चौकशी करण्याची सचिन रणदिवे यांची मागणी

फोंडशिरस (बारामती झटका)
मौजे फोंडशिरस, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथील बाणलिंग वनराईमध्ये सन २०२०-२१, २०२१- २२ या आर्थिक वर्षात या गटामध्ये रोपांची लागवड करण्यात आली असून सदर काम हे सोलापूर वनविभाग सोलापूर वनपरिक्षेत्र माळशिरस यांच्या अंतर्गत झाले असून सदर योजना निकृष्ट वनाचे पुर्नवनीकरण (RDF) २४०१-३२०१ PMW_ या योजने अंतर्गत झाले असून या गटामधील रोपे मोठ्या प्रमाणात जळालेली दिसत येत आहेत.
तरी या गटामध्ये किती रोपांची लागवड झाली, किती रोपे जळून गेली व किती रोपे अस्तित्वात आहेत, याची चौकशी आपण आमच्या समक्ष करावी. दि. २५/०९/२०२३ पर्यंत या निवेदनाच्या अनुषंगाने आपण चौकशी न केल्यास नाईलाजास्तव दि. २७/०९/२०२३ रोजी मा. तहसिल कार्यालय माळशिरस येथे आपल्या विरोधामध्ये हलगीनाद आंदोलन करण्यात येईल असे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng