फुले दांपत्याचे शैक्षणिक व सामाजिक कार्य प्रेरणादायी व अजरामर – ह. भ. प. तुकाराम कापसे
श्री संत गाडगेबाबा विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त घेतलेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरण
माढा (बारामती झटका)
ज्या काळात मुलींना शिक्षणाची मुभा नव्हती, समाजात जातिभेद, रुढी, प्रथा परंपरा व अंधश्रध्देचे पेव फुटलेले होते. पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा समाजावर होता. अत्यंत भयंकर व विदारक असे सामाजिक चित्र होते. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून फुले दांपत्यानी समाजकंटकांचा विरोध झुगारून मुलींसाठी शाळा सुरू केली. त्यांच्यावर प्रस्थापितांकडून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठविला. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे फुले दांपत्याचे शैक्षणिक व सामाजिक कार्य अजरामर असल्याचे प्रतिपादन ह. भ. प. तुकाराम कापसे यांनी केले आहे.
ते आनंदनगर-मानेगाव येथील श्री संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या वेळी बोलत होते.
यावेळी प्रास्ताविक सहशिक्षिका तनुजा तांबोळी यांनी केले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तेजस्विनी महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा वैशाली शिंदे या होत्या.
सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन महिला बचत गटाच्या सीआरपी शीतल देशमुख व रोहिणी भोगे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त घेतलेल्या रांगोळी स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक प्राप्त पुजा पवार, अंजली लटके, संस्कृती बगडे व सुंदर हस्ताक्षर स्पर्धेतील स्नेहा खोत, संस्कृती निकम, अस्मिता लटके यांना महिला बचत गट व तेजस्विनी ग्रामसंघाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य व बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून शासनाच्या आरोग्य विभाग व मानेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश खेंदाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोगशाळा तंत्रज्ञ साक्षी हांडे, भारती शिंदे व दैवशाला ताटे यांनी विद्यालयातील मुलींची हिमोग्लोबीन तपासणी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हिमोग्लोबीनसह इतर तपासण्या केल्या.
यावेळी स्नेहा जगताप, सृष्टी खोत, शिवम कापसे, ईश्वरी कापसे, प्राजंली कापसे, आदिती भोगे, आरव जगताप, अनुश्री लटके, आरती पवार, अंजली लटके, अस्मिता लटके, स्नेहा खोत, श्रुती घोगरे या विद्यार्थ्यांनी मनोगत व गीत तर महिला बचत गटाच्या सीआरपी रोहिणी भोगे, शीतल देशमुख, मोहिनी पारडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन इयत्ता नववीतील विद्यार्थिनी पुजा पवार हिने केले. तर आभार हर्षदा कापसे हिने मानले.
यावेळी प्रभारी मुख्याध्यापक प्रविण लटके, माजी सरपंच शिवाजी भोगे, सचिन क्षीरसागर, सुनील खोत, सुधीर टोणगे, सीआरपी शीतल देशमुख, रोहिणी भोगे, सचिव दिपाली देशमुख, भारती शिंदे, मोहिनी पारडे, सुनयना क्षीरसागर, दैवशाला ताटे, साक्षी हांडे, मृणाल भोगे, सागर राजगुरू यांच्यासह इयत्ता पाचवी ते दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.