Uncategorizedताज्या बातम्या

नातेपुते गावच्या शिरपेचामध्ये गणेश कुचेकर यांनी मानाचा तुरा रोवला, मित्र परिवारांचा सत्कारासाठी एकत्र झाला मेळ…

लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेच्या नातेपुते शाखेच्या सल्लागारपदी गणेश मुक्ताराम कुचेकर यांची नेमणूक करण्यात आली….

नातेपुते (बारामती झटका)

नातेपुते ता. माळशिरस, येथील सामाजिक, व्यवसायिक व सर्वांपर्यंत जनसंपर्क असणारे श्री गणेश मुक्ताराम कुचेकर यांची महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर या पतसंस्थेच्या नातेपुते शाखेचे सल्लागार म्हणून सर्वानुमते नेमणूक करण्यात आलेली आहे. सल्लागारपदी निवड होताच मित्रपरिवार यांनी सत्कार करून भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जय मल्हार पतसंस्थेचे चेअरमन अमोल अण्णा पाडसे, सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य महेश सोरटे, उद्योजक सचिन साळी, रिपब्लिकन पार्टी आठवले गट तालुका सरचिटणीस रोहित उर्फ बादल सोरटे, नारायण काळे, संभाजी कदम, वैभव डफळ, बाळासाहेब भांड, राकेश सोरटे आदी मित्रपरिवार यांनी सत्कार केला.

नातेपुते नगरी उद्योग व्यापार व व्यावसायिक यांची राजधानी संबोधली जाते अशा नातेपुते नगरीमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील गणेश कुचेकर यांनी आपल्या कार्यकर्तृत्व व सोज्वळ स्वभाव संघटन कौशल्य या जोरावर नातेपुते पंचक्रोशीत आपली स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. वास्तविक पाहता लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था सोलापूरची आहे. नातेपुते गावच्या शिरपेचामध्ये गणेश कुचेकर यांनी मानाचा तुरा रोवला. मित्र परिवार सत्कारासाठी एकत्र आलेले आहेत.

नातेपुते परिसरात त्यांना शाखेच्या प्रगतीसाठी शाखेतील प्रत्येक सभेस उपस्थित राहून आपल्या अमूल्य मार्गदर्शनाचा व ज्ञानाचा लाभ वेळोवेळी होणार असे संस्थेस विश्वास वाटत असल्याने आपल्या सूचना व नाविन्यपूर्ण कल्पनांचे संस्थेत सदैव स्वागत राहणार असल्याने सल्लागारपदी सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button