ताज्या बातम्याराजकारण

“गद्दारांना” पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर कार्यालयाकडून झटका बसणार…

खासदार निधी व जिल्हा नियोजन समिती व विविध योजनेमधील विविध विकासकामांत गद्दारी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गंडांतर येणार…..

माळशिरस (बारामती झटका)

माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी निवडणुकीपूर्वी खासदार निधी जिल्हा नियोजन समिती व विविध योजनेमधील विकासकामे मंजूर झालेली होती. सदरची विकास कामे कार्यकर्त्यांना दिलेली होती‌ त्यामध्ये विकासकामे घेतलेले कार्यकर्ते यांनी निवडणुकीत गद्दारी करून विरोधी गटाचा प्रचार केलेला आहे, अशा गद्दारी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गंडांतर येणार आहे. गद्दारांना पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या संपर्क कार्यालयाकडून झटका बसणार आहे.

गद्दारी करणाऱ्या कार्यकर्त्यांची कामे काढून घेण्याच्या हालचालीला वेग आलेला आहे. माढा लोकसभा मतदार संघात माळशिरस तालुक्यात राजकीय फेरबदल झालेले आहेत. काही कार्यकर्ते खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या समवेत निवडणुकीपुरते विकासकामे मिळवण्यासाठी सोबत होते. अशा गद्दारांचे पितळ निवडणुकीत उघडे पडले आहे.

माळशिरस तालुक्यात नातेपुते, माळशिरस, महाळुंग-श्रीपुर नगरपंचायत व विविध ग्राम पंचायतीमध्ये विविध योजनेतून कोट्यावधी रुपयांची विकासकामे मंजूर केलेली होती. आचारसंहिता सुरू झाल्याने विकासकामे ठप्प झालेली होती. विकास कामे वाटत असताना काही चुकीच्या कार्यकर्त्यांना वाटप झालेली होती. गद्दारांनी निवडणुकीत आपला रंग दाखविलेला असल्याने खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या संपर्क कार्यालयाने महत्वपूर्ण निर्णय घेतलेला असल्याने गद्दारांना झटका बसणार आहे. सदरची कामे रद्द न करता निष्ठावान कार्यकर्त्यांना विकासकामे करण्याची संधी मिळणार आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button