गारवाड पाटी येथे कै. निवृत्ती गोरड यांच्या पुण्यस्मरणानिमित्त एक आदत एक बैल भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन

माळशिरस (बारामती झटका)
गोरडवाडी गावचे माजी सरपंच कै. निवृत्ती (दादा) शंकर गोरड यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त विजय (दादा) गोरड मित्र मंडळ व समस्त ग्रामस्थ गोरडवाडी एक आदत एक बैल भव्य बैलगाडा शर्यत सरपंच केसरी चे आयोजन मंगळवार दि. २९/१०/२०२४ रोजी सकाळी ८ वा. गारवाड पाटी, माळशिरस-म्हसवड रोड, ता. माळशिरस, येथे करण्यात आले आहे.
सदर शर्यतीमध्ये प्रथम क्रमांकाचे १ लाख १ रु. बक्षीस विजय बाजीराव देशमुख नगरसेवक माळशिरस, गोरख हनुमंत देशमुख गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर, लालासो रामचंद्र बाजारे गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर, राजेंद्र हनुमंत कळसुले शेठ गोरडवाडी यांच्या वतीने देण्यात येणार आहे. दुसरे बक्षीस ७१ हजार १ रु. अजिनाथ शिवाजी माळी निमसाखर कावेरी गोल्ड म्हैसूर यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. तिसरे बक्षीस ४१ हजार १ रु. शिवाजी ज्ञानदेव देशमुख माजी नगराध्यक्ष माळशिरस, महादेव माने ग्रामपंचायत सदस्य मोटेवाडी यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. चौथे बक्षीस ३१ हजार १ रु. सतीश रामचंद्र मोटे सरपंच मोटेवाडी, मामा भानुदास हुलगे मा. ग्रामपंचायत सदस्य सिद्धनाथ कुस्ती कमिटी मोटेवाडी यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. पाचवे बक्षीस २१ हजार १ रु. जयवंत दत्तु सुळ सरपंच चांदापुरी यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. सहावे बक्षीस १५ हजार १ रुपये धनाजी शिवाजी शेंडगे, रेडे, अप्पासो बाजीराव हुलगे शिवशंकर वेल्डिंग वर्क्स, गोरडवाडी, तुकाराम भगवान गोरड बाळूमामा अर्थमूव्हर्स गोरडवाडी यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. सातवे बक्षीस १० हजार १ रु. नानासाहेब रामचंद्र पाटील युवा नेते रेडे, लक्ष्मण तुळशिराम कर्णवर पाटील युवा नेते गोरडवाडी यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. तसेच यावेळी कैलासवासी निवृत्ती शंकर गोरड यांच्या स्मरणार्थ प्रत्येक बक्षीसास मनाची ढाल सरपंच केसरी दिली जाईल.

या मैदानावरील झेंडा पंच म्हणून धनावडे बापू, कोरेगाव हे काम पाहणार आहेत. तर या मैदानाचे समालोचक सुनील मोरे (सरकार) पेडगाव, संपत वाघमोडे, माळशिरस हे करणार आहेत. या शर्यतीच्या ऑनलाईन नोंदणीसाठी कल्याण गोरड ९६८९६२९७२१, अभिजीत कर्णवर ७२६२०४०१०१, जयवंत गोरड ८६०५७७८१६६, कांतीलाल लवटे ९८२२७०८८९८ यांच्याशी संपर्क साधावा. तर या शर्यतीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी विजय गोरड (माजी सरपंच) ८८८८१८१८०९, शिवाजी गोरड ९६६५४४७०९०, मल्हारी गोरड ९८२२७२७४१९, बिरा गोरड ९५४५०९१०६६ यांच्याशी संपर्क साधावा.
तरी या भव्य बैलगाडा शर्यतीस बैलगाडा चालक-मालक, शौकीन यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक विजय दादा गोरड मित्र मंडळ व समस्त ग्रामस्थ गोरडवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.