ताज्या बातम्याराजकारण

गटबाजीच्या राजकारणामुळे तालुका रसातळाला गेला – महेश चिवटे

करमाळा (बारामती झटका)

स्वतःच्या नावाचे गट तयार करून राजकारणात या गटामार्फत आर्थिक व सत्तेचा सौदा करणाऱ्या प्रवृत्तीमुळे तालुका रसातळाला गेला असून विकासकामाला खीळ बसत आहे. यामुळे तालुक्यातील इथून पुढे गटबाजीचे राजकारण संपून पक्षीय राजकारण तयार झाले तरच तालुक्यात विकासकामे होतील व सर्वसामान्य कार्यकर्ते सत्तेत येतील, असे मत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी व्यक्त केले

देवळाली येथे आज टेल्को कंपनीत कामगार युनियनमध्ये बिनविरोध निवडून आलेले औदुंबर गणेश कर व जिल्हा नियोजन मंडळाचे नूतन सदस्य महेश चिवटे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पुढे बोलताना महेश चिवटे म्हणाले की, राहुल कानगुडे सारखा तरुण कार्यकर्ता तालुका पातळीवर राजकारणात आला पाहिजे.
देवळालीमधील प्रत्येक नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कानगुडे सदस्य असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली देवळाली येथे शिवसेना मजबूत असून येणाऱ्या काळात देवळाली ग्रामपंचायतीवर शिवसेना झेंडा फडकून देवळालीचा विकास करेल, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी राहुल कानगुडे बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला निधी राजकीय द्वेषामधून परत पाठवण्याचे पाप सत्ताधारी करत आहे.

यावेळी औदुंबर गणेश कर बोलताना म्हणाले की, देवळाली ग्रामस्थांच्या उपकारामधून मुक्त होण्यासाठी इथून पुढे विकासाच्या कामासाठी मदत करणार असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमासाठी शिवसेना करमाळा विधानसभा अध्यक्ष राहुल कानगुडे, माजी पंचायत समिती सभापती गहिनीनाथ ननवरे, सतीश कानगुडे, सोसायटीचे चेअरमन बापूसाहेब कानगुडे, अण्णासाहेब शिंगाडे, रमेश गायकवाड, माजी सरपंच बाळासाहेब शिंदे, गोरख पवार, सचिन ढेरे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख श्रीकांत गोसावी, सौदागर बिचितकर, कैलास बिचीतकर, कुंडलिक कानगुडे, प्रफुल्ल दामोदरे, निवृत्ती पडवळे, आप्पासाहेब गणेश कर, सुनील कानगुडे, नितीन दामोदरे, नितीन कानगुडे, विठ्ठल गोसावी, सुधीर आवटे, चेतन राखुंडे, दादा शेख, भरत चोपडे, भैय्या राज गोसावी, गणेश साळवे, रवी गणेश कर, विलास चव्हाण, निलेश कानगुडे, सोमा साळवे, मोहन आवटे, हनुमंत वीर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत ऍम्ब्युलन्स सेवा देण्यात आली असून याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा माजी सभापती गहिनीनाथ ननवरे यांनी केला.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort