गेली ३२ वर्ष गणेशोत्सवात लालबागच्या राजाचे दर्शन घेणारे अकलूजचे किशोरसिंह माने पाटील

संग्रामनगर (बारामती झटका) (संजय लोहकरे यांजकडून)
अकलूज गावचे माजी सरपंच, लोकनेते, दिन दलितांचे कैवारी किशोरसिंह माने पाटील यांनी यावर्षी मुंबईच्या लालबागच्या राजाचे दर्शन घेतले व तेथून आणलेला प्रसाद हजारो गणेश भक्तांना वाटण्यात आला. त्यामुळे अकलूजमधील गोरगरिब व सर्व सामान्य लोकांना लालबागच्या गणपतीचे दर्शन घेता येत नसले तरी प्रसाद मिळाल्यामुळे गणेश भक्त आनंदी झाले आहेत.
किशोरसिंह माने पाटील हे सन १९९२ सालापासून दरवर्षी न चुकता गणेशोत्सवात एक दिवस लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन येतात. यावर्षीचे त्यांचे ३२ वे वर्ष होते. त्यांना लालबाग गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, सचिव सुधीर साळवी, बाळा कणखर, संकेत खामकर, तापस केसलिकर, अमोल रोकडे, शिवब्रम्हे, सतिश खाणकर, राजू परब, कृपालाणी व वेशभूषाकार पवार यांचे बहुमोलाचे सहकार्य लाभते. यावर्षी किशोरसिंह माने पाटील यांच्या बरोबर क्रांतीसिंह माने पाटील, शुभम नेवसे, समर्थ घोगरे, चैतन्य मुळे, मनोजकुमार नेवसे यांनी लालबागच्या गणपतीच्या दर्शनाचा लाभ घेतला.


अकलूजकरांचे व लालबाग गणेशोत्सव मंडळाचे एक आपुलकीचे संबंध आहेत. लालबागच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी दररोज लाखो गणेश भक्त येत असतात. तेथून आणलेला प्रसाद किशोरसिंह माने पाटील हे किमान एक लाख गणेश भक्तांना मिळावे, याचे नियोजन करत असतात. यामध्ये अकलूज मधील सर्व गणेशोत्सव मंडळ, सर्व नवरात्र मंडळ, अकलूजमधील सर्व रिक्षा स्टाॅप तसेच महाळूंग, नातेपुते, माळशिरस, अकलूज या ठिकाणी अन्नदानाच्या ठिकाणी प्रसाद दिला जातो. अक्कलकोट येथील स्वामी समर्थ महाराज अन्नदान छत्रात व गोंदवलेकर महाराज यांच्या अन्नदान बरोबर या प्रसादाचे वाटप करण्यात येते. ज्यांना प्रसाद दिला आहे ते मंडळे, नागरिक, मित्र परिवार, आप्तेष्ट, सहकारी संस्था, शाळा, महाविद्यालय, मुलांचे वस्तीगृह यांना दिलेला प्रसाद इतर लाडू, पेढे प्रसादात समाविष्ट करून पुढे वाटप करण्याचे आवाहन करण्यात येत असते. अशा माध्यमातून किमान एक लाख गणेश भक्तांपर्यंत प्रसाद पोहचवला जातो. असे नियोजन करण्यात येते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.