गोरडवाडी येथे श्री बिरोबा विजयी दसरा यात्रेनिमित्त भव्य निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन

गोरडवाडी (बारामती झटका)
गोरडवाडी ता. माळशिरस येथे श्री बिरोबा विजयी दसरा यात्रेनिमित्त भव्य निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन बळीराजा कुस्ती कमिटी व समस्त ग्रामस्थ गोरडवाडी यांच्यावतीने बुधवार दि. २५/१०/२०२३ रोजी दुपारी ३ वा. बिरोबा मंदिर, गोरडवाडी येथे करण्यात आले आहे. यावेळी विधानपरिषदेचे आ. रणजितसिंह मोहिते पाटील, माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम सातपुते, भाजपचे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
सदर मैदानात श्री. धर्मराज माने कन्हेर (ओंकार शुगर चांदापुरी), माणिक कोकरे ग्रामपंचायत सदस्य व शिवाजी किसन गोरड यांच्यावतीने पैलवान विक्रम भोसले, खवासपूर विरुद्ध पै. मनोज माने, कुर्डूवाडी यांच्यात लढत होणार आहे. तसेच कै. बिरा गणू गोरड व कै. माणिक गणू गोरड यांच्या स्मरणार्थ श्री. गोपीनाथ गोरड, संभाजी गोरड, माणकीचे डबल सरपंच किरण माने, लोकप्रिय तानाजी रणवरे (सर), पै. मच्छिंद्र कळसुले यांच्यावतीने पै. शुभम माने, कन्हेर विरुद्ध पैलवान प्रदीप ठाकूर, सांगली यांच्यात लढत होणार आहे. पैलवान तुका आबा गोरड, श्री. धुळा बिरा गोरड, श्री. वैभव गोरड कॉन्ट्रॅक्टर मुंबई, पांडुरंग तात्या पिसे (सरपंच, गोरडवाडी) यांच्या वतीने पैलवान समाधान गोरड, गोरडवाडी विरुद्ध पैलवान अण्णा चव्हाण, पंढरपूर यांच्यात लढत होणार आहे. आबाजी हुलगे, गोरख गोरड युवा नेते शिवसेना, आकाराम पिंगळे, ज्ञानदेव कोकरे, पै. दिलीप शेंबडे यांच्या वतीने पैलवान धुळदेव पांढरे, भांब विरुद्ध पैलवान धनाजी मगर, निमगाव यांच्यात लढत होणार आहे. श्री. बळीराम चव्हाण सर, श्री. किसन हरीबाबा हुलगे, श्री. देवा हुलगे, श्री. धनाजी गोरड कॉन्ट्रॅक्टर अलिबाग, श्री खंडू कळसुळे, चेअरमन यांच्या वतीने पै. समाधान गोरड, गोरडवाडी विरुद्ध पै. शंकर बंडगर, गारअकोले यांच्यात लढत होणार आहे. श्री. शंकर यमगर (डि. सरपंच) पै. नाना यशवंत कोकरे, श्री. कैलास पवार (डी. सरपंच), श्री. काका आवळे, कॉन्ट्रॅक्टर यांच्या वतीने पैलवान भरत यमगर गोरडवाडी, विरुद्ध पैलवान सागर गायकवाड, म्हसवड यांच्यात लढत होणार आहे.

श्री युवराज पिंगळे, मेजर, श्री नाना विठ्ठल हुलगे, श्री तुकाराम कोकरे (पांडुरंग हार्डवेअर), श्री. कांता लवटे यांच्यावतीने पै. सोमा गोरड, गोरडवाडी विरुद्ध पैलवान हर्षवर्धन गुरव, खुडूस यांच्यात लढत होणार आहे. श्री. आप्पा दगडू गोरड, श्री. नाना यमगर माजी ग्रामपंचायत सदस्य, श्री. किसन देनबा हुलगे, पै. तुषार गोरड, श्री. आबा हुलगे यांच्या वतीने पै. राहुल गोरड, गोरडवाडी विरुद्ध पै. संग्राम शेंडगे, नातेपुते यांच्यात लढत होणार आहे. श्री. बिरा गोरड अभिनेते, श्री. सुनील हुलगे चेअरमन, श्री. भारत कळसुले, श्री. ज्योतीराम कळसुले, पै. रामा हुलगे यांच्यावतीने पै. माऊली लवटे, तांबवेपाटी विरुद्ध पै. सौरभ गोरड, म्हसवड यांच्यात लढत होणार आहे. कै. नाना निवृत्ती हुलगे यांच्या स्मरणार्थ श्री. जयवंत हुलगे, श्री. उत्तम हुलगे, चेअरमन शामराव हुलगे, युवा नेते भागवत हुलगे यांच्यावतीने पै. संग्राम टेळे, माळशिरस विरुद्ध पै. बालाजी निंबाळकर यांच्यात लढत होणार आहे. श्री. दुर्योधन गोरड, श्री. आप्पा गोरड, श्री. ईश्वर गोरड, श्री सुग्रीव गोरड माजी सरपंच यांच्यावतीने पै. करण हुलगे, गोरडवाडी विरुद्ध पै. विशाल वाघमोडे यांच्यात लढत होणार आहे. श्री रावसाहेब मगर, श्री. अण्णा यमगर, श्री. नवनाथ केंगार, श्री. ताजी वायदंडे, श्री. संजय मिसाळ, श्री. राघू अवघडे, सर्व लहुजी ग्रुप गोरडवाडी यांच्या वतीने पै. चैतन्य यमगर, विरुद्ध पै. योगेश टेळे यांच्यात लढत होणार आहे. पै. अण्णा वाघमोडे, श्री. नामदेव गोरड (इंजिनियर), श्री. संजय कोळेकर (चेअरमन), श्री. सत्यवान नरळे, श्री. प्रशांत बाड यांच्या वतीने पै. समाधान गोरड विरुद्ध पै. माऊली वाघमोडे यांच्यात लढत होणार आहे. श्री. शंकर गोरड (इंजिनियर), श्री. बापू केंगार, श्री. संजय हुलगे, श्री. अजिनाथ आवळे, श्री. राजू वायदंडे, श्री. बापू होनवाड यांच्या वतीने पै. बिरूदेव गोरड, गोरडवाडी विरुद्ध पै. नागेश गेजगे, नातेपुते यांच्यात लढत होणार आहे. श्री. भाऊसाहेब पिंगळे, श्री. रामभाऊ कर्णवर, श्री. दादा कोळेकर, श्री. शहाजी कोळेकर यांच्या वतीने पै. शुभम मगर, निमगाव विरुद्ध पै. प्रदीप मदने, म्हसवड यांच्यात लढत होणार आहे. श्री शुभम पवार, श्री. चैतन्य माने बैलगाडा प्रेमी, श्री मंगलमूर्ती मेडिकल पुणे, सूर्यवंशी बंधू, पै. महेश खरात अनुराज उद्योग समूह यांच्या वतीने पै. देवेंद्र हुलगे, गोरडवाडी विरुद्ध पै. किरण नरळे, माळशिरस यांच्यात लढत होणार आहे.
तसेच यावेळी उद्घाटनाची कुस्ती अप्पा हुलगे, श्री. अजित हुलगे सर, श्री. मोहन कर्णवर, श्री. धोंडीराम कर्णवर यांच्यावतीने पै. सौरभ यमगर, गोरडवाडी विरुद्ध पै. किशोर मारकड, माळशिरस यांच्यात लढत होणार आहे. पै. समाधान गोरड, श्री. मल्हारी हुलगे, श्री. शंकर हुलगे, श्री. सतीश हुलगे, पै. सोनू हुलगे यांच्या वतीने पै. श्रेयस पिसे, गोरडवाडी विरुद्ध पै. वीर माने, मांडकी यांच्यात लढत होणार आहे.
यावेळी पै. भरत गोफणे जी.एस.टी. ऑफिसर, श्री. प्रदीप गोरड सहाय्यक निबंध सह. संस्था, डॉ. नितीन वाघमोडे, डॉ. अप्पासाहेब टेळे, डॉ. प्रवीण मिसाळ आदींचा सत्कार करण्यात येणार आहे. सदर मैदानाचे समालोचन पै. हनुमंत शेंडगे व पै. धनाजी मदने हे करणार आहेत. याविषयी अधिक माहितीसाठी पै. गणेश कर्णवर ८८०५६७००७८, पै. तुकाराम गोरड ९७६६१२६५६५, पै. शिवाजी गोरड ९६६५४४७०९०, पै. सचिन कर्णवर ९७३०३२३२७८, पै. भाऊ पिंगळे ८२०८००५६४८ यांच्याशी संपर्क साधावा. तरी कुस्तीशौकीन, मल्ल सम्राट यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ग्रुपमध्ये बारामती झटका न्यूज संपादक श्रीनिवास कदम पाटील 9850104914 हा नंबर समाविष्ट करावा..