विशेष

संग्रामनगर येथे श्री ब्रह्मचैतन्य श्रीराम मंदिरात श्री दुर्गा सप्तशती पाठ उपक्रम.

संग्रामनगर (बारामती झटका)

संग्रामनगर (ता. माळशिरस) येथील श्री ब्रह्मचैतन्य श्रीराम मंदिर येथे पुण्यपावन मंगलमय श्री शारदीय नवरात्रीनिमित्त घटस्थापनेपासून दररोज दुपारी ३ ते ५ या वेळेमध्ये श्री दुर्गा सप्तशती पाठ सेवा सुरू करण्यात आलेला आहे.

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा व बाल संस्कार केंद्र (दिंडोरी) प्रणित त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक अंतर्गत श्री स्वामी समर्थ उपासना केंद्र संग्रामनगर येथील श्री ब्रह्मचैतन्य श्रीराम मंदिर येथे प.पू.पद्मावतीताई शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेले आहे.या उपासना केंद्रमार्फत श्री शारदीय नवरात्री निमित्त श्री दुर्गा सप्तशती पाठ सेवा नियमितपणे संपन्न होत आहे.येथील केंद्राच्या प्रतिनिधी सौ.मनिषाताई वेल्लेकर यांचे मार्गदर्शनाखाली या उपक्रमामध्ये सुमारे ४५ महिला सहभागी झालेल्या आहेत.योग्य छंदात व लयबध्द स्वरात श्री दुर्गा सप्तशती पाठ सेवा करीत आहेत.

श्री स्वामी समर्थ उपासना केंद्रात प्रत्येक शुक्रवारी दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत श्री स्वामी समर्थ सत्संग सेवा व आरती कार्यक्रम होत असून प्रत्येक रविवारी सकाळी १० ते ११ या वेळेत बाल संस्कार वर्गाच्या माध्यमातून लहान बालकांना श्री गणेश स्रोत्र,श्री सरस्वती स्तोत्र,श्री गायत्री मंत्र, योगासने, श्री स्वामी समर्थ जप, बोधकथा इत्यादी उपक्रम घेतले जात आहेत.

प. पू. पद्मावतीताई शेंडे यांचे मार्गदर्शनाखाली गेली १५ वर्षापासून माळशिरस तालुक्यात अकलूज, संग्रामनगर, माळशिरस, नातेपुते, वेळापूर या ठिकाणी श्री स्वामी समर्थ उपासना केंद्राची स्थापना करण्यात आलेली असून या केंद्राच्या माध्यमातून सुमारे ४०० तर ५०० महिला उपासनेमध्ये सहभागी झालेल्या आहेत.

या सर्व उपासना केंद्रामध्ये कलियुगातील श्री स्वामी समर्थांच्या उपदेशाप्रमाणे प्रश्नोत्तर सेवेतून प. पू. पद्मावतीताई शेंडे सर्वसामान्य साधकांच्या शंका व प्रश्नांना समर्थक पणे शंकाचे निरसन करून त्यांचे प्रश्न सोडविण्याची सेवा करतात.कलयुगातील नामस्मरण बाबत मार्गदर्शन केले जाते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ग्रुपमध्ये बारामती झटका न्यूज संपादक श्रीनिवास कदम पाटील 9850104914 हा नंबर समाविष्ट करावा..

Related Articles

9 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button