गौतमआबा माने गटाने थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच पदावर “बाजीराव” च सिंघम केला.
माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य गौतमआबा माने गटाने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील गटाचे भाजप मुळासकट उपटून टाकला
कण्हेर (बारामती झटका)
माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात राजकीय दृष्ट्या महत्त्वाची समजली जाणारी बहुचर्चित कण्हेर ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील पुरस्कृत कण्हेरसिद्ध ग्रामविकास पॅनल व माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य गौतमआबा माने पुरस्कृत कण्हेरसिद्ध ग्रामविकास पॅनल यांच्या थेट जनतेतील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्यात अटीतटीची व चुरशीची निवडणूक होऊन गौतमआबा माने गटाने थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच पदावर “बाजीराव” च सिंघम करून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील पुरस्कृत भाजप नेते, कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या गटाचे भाजप मुळासकट उपटून टाकून देऊन ग्रामपंचायतीवर निर्विवाद एकहाती सत्ता मिळविलेली आहे.
कण्हेर ग्रामपंचायत गतवेळच्या निवडणुकीत मराठा धनगर असे मताचे विभाजन होऊन गौतम आबा माने यांची पंधरा वर्षाची सत्ता परिवर्तन होऊन मोहिते पाटील समर्थक यांची सत्ता कण्हेर ग्रामपंचायतीवर स्थापन झालेली होती. गौतमआबा माने गट पराभव पचवून जोमाने कामाला लागलेले होते. पाच वर्षांमध्ये जनतेशी जनसंपर्क दांडगा ठेवलेला होता. दरम्यानच्या काळामध्ये कण्हेर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत दणदणीत विजय संपादन करून विरोधकांचा सुपडा साफ केलेला होता.
ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्यापासून गौतमआबा माने, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने गावामध्ये तळ ठोकून होते. थेट जनतेतील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उमेदवारी जाहीर करीत असताना सर्व जाती धर्मातील मतदारांना विश्वासात घेऊन उमेदवारी जाहीर केलेल्या होत्या. विजयसिंह मोहिते पाटील पुरस्कृत पॅनलकडून सौ. सोनल दत्तात्रय माने तर गौतमआबा माने पॅनलकडून बाजीराव महादेव माने सरपंच पदासाठी उमेदवार जाहीर केलेले होते. बाजीराव माने यांच्याबद्दल तर्कवितर्क काढले जात होते. विरोधी गटाकडून आरोप प्रत्यारोप होत होते. गौतमआबा माने यांच्याबरोबर बाबासाहेब माने, एकनाथ माने व परिवारातील सर्व सदस्य एकवटून जोमाने कामाला लागलेले होते. गावातील सर्व प्रतिष्ठित जाती धर्मातील लोकांना एकत्र करून विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय माने यांचाही जोरात प्रयत्न सुरू होता. गतवेळच्या निवडणुकीत मराठा सरपंच पदाचा उमेदवार देऊन पराभव जरी पत्करावा लागला तरी, त्याची परवा न करता गौतमआबा माने गटाने उमेदवारी दिलेली होती.
यंदाच्या निवडणुकीत अनेक लोकांकडून घरातील उमेदवारी द्यावी, असा आग्रह होता. तरीसुद्धा बाजीराव माने यांना उमेदवारी देऊन घरातीलच उमेदवार उभा आहे, अशा पद्धतीने गौतमआबा, बाबासाहेब, एकनाथदादा या त्रिमूर्तींनी निवडणूक यंत्रणा लावलेली होती. गौतमआबा गटातील राजाभाऊ माने, अशोकराव ठवरे यांच्यासारखे अनेक कार्यकर्ते यांनी जीवाचे रान करून गतवेळच्या निवडणुकीतील पराभवाचा बदला घेऊन विरोधकांचा सुपडा साप केलेले आहेत.
थेट जनतेतील सरपंच पदाचे उमेदवार बाजीराव महादेव माने यांना 2156 तर, सोनल दत्तात्रय माने यांना 1538 व नोटा 7 असे मतदान झालेले आहे.
प्रभाग क्रमांक एक बर्वे शंकर रामचंद्र 382, शिंदे विठ्ठल शंकर 483, नोटा 02, काळे अक्काताई भीमराव 473, काळे तेजस्विनी सुनील 390, नोटा 04, शिंदे पुनम महादेव 414, शेंडगे सुवर्णा विजय 450, नोटा 03.
प्रभाग क्रमांक दोन काळे मारुती भगवान 425, चव्हाण दादा पांडुरंग 453, नोटा 04, माने प्रथमेश सुभाष 461, माने संभाजी रामचंद्र 451, नोटा 02, माने मंगल सुहास 489, माने सायली प्रशांत 401, नोटा 08.
प्रभाग क्रमांक तीन पाटील दत्तात्रय प्रकाश 279, माने अशोक हवसराव 273, नोटा 2, काळे वर्षाराणी कुंडलिक 275, माने दिपाली महादेव 275, नोटा 04.
प्रभाग क्रमांक चार माने कल्याण साधू 202, माने दादासो सदाशिव 371, नोटा 03, देवकते अनिता बापू 401, वाघमोडे संगीता हनुमंत 147, नोटा 01.
प्रभाग क्रमांक पाच कुंभार नारायण अण्णा 440, माने उज्वला अनिल 366, नोटा 01, केंगार शितल सोमनाथ 381, केंगार हिराबाई महादेव 417, नोटा 07, बोडरे मनीषा सागर 449, बोडरे रुक्मिणी विष्णू 353, नोटा 04 अशी उमेदवारांना प्रभाग निहाय मते पडलेली आहे. त्यामध्ये थेट जनतेतील सरपंच नागरिकांचा मागास प्रवर्ग बाजीराव महादेव माने सर्वसाधारण, शिंदे विठ्ठल शंकर नागरिकांचा मागास प्रवर्ग, काळे अक्काताई भीमराव सर्वसाधारण स्त्री राखीव, शेंडगे सुवर्णा विजय सर्वसाधारण, चव्हाण दादा पांडुरंग सर्वसाधारण, माने प्रथमेश सुभाष नागरिकांचा मागास प्रवर्ग, माने मंगल सुहास स्त्री राखीव, पाटील दत्तात्रेय प्रकाश, सर्वसाधारण स्त्री राखीव काळे वर्षाराणी कुंडलिक, नागरिकांचा मागास प्रवर्ग माने दादासो सदाशिव, कुंभार नारायण अण्णा अनुसूचित जाती, केंगार हिराबाई महादेव सर्वसाधारण स्त्री राखीव, बोडरे मनीषा सागर स्त्री राखीव असे थेट जनतेतील सरपंच व तेरा ग्रामपंचायत सदस्य निवडून आलेले आहेत. विरोधी गटाच्या हक्काच्या मतदार संघात गौतमआबा माने यांचा पुतण्या अशोकराव हवसराव माने यांना उमेदवारी देऊन निवडणुकीची रंगत वाढवलेली होती. एक सदस्य निवडून आणण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. अशोक माने यांचा निसटता पराभव झालेला आहे. पाटील दत्तात्रय प्रकाश एकमेव विरोधी गटाचे ग्रामपंचायत सदस्य निवडून आलेले आहेत. त्यांच्या परिवारातील सदस्य सुद्धा राष्ट्रवादीच्या विचाराचे आहेत.
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील पुरस्कृत पॅनलला नाव असल्याने शिवरत्नवरील मोहिते पाटील यांचे या निवडणुकीकडे बारीक लक्ष होते. सर्वतोपरी सहकार्य केलेले होते. तरीसुद्धा गौतमआबा माने गटाने भाजपच्या विचाराचे असणारे मोहिते पाटील समर्थक यांचे भाजप मुळासकट उपटून टाकून पॅनलचा सुपडा साफ केलेला आहे. मतदानानंतर विरोधी गटाकडून विजयाचा दावा केलेला होता. तरीसुद्धा गौतमआबा माने गटाची वादळापूर्वीची शांतता होती. निवडणुक निकालानंतर कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला. कार्यकर्त्यांच्या हातामध्ये ओन्ली आबा “बाप तो बाप रहेगा” पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. माळशिरसमधून घोड्यावरून मिरवणूक काढून ग्रामदैवताचे दर्शन घेऊन कण्हेर येथील निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरलेले कण्हेरसिद्धनाथाच्या दर्शनासाठी रवाना झालेले होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Very engaging and funny! For more information, click here: LEARN MORE. Let’s chat!
Wonderful insights! The way you break down the complexities is commendable. For additional information on this topic, I recommend visiting: EXPLORE FURTHER. Keen to hear more opinions from the community!