ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांची भूसंपादनातील जागेच्या व घराच्या बेकायदेशीर नोंदी घेऊन सावळ्या गोंधळात लक्ष घालण्याची गरज….
श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग विस्तारीकरणाच्या निवाड्यात शासनाच्या पैशाचा अपव्यय झाला….
अकलूज (बारामती झटका)
कैवल्य साम्राज्य श्री संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे विस्तारीकरण/चौपदरीकरण करण्याकरता बाजूच्या क्षेत्राचे सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादित करण्यात आलेले होते. माळशिरस तालुक्यात श्री संत ज्ञानेश्वर महाराज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ त्यामधील 59 किमी ते 117 किमी एकूण लांबी 58 किलोमीटर. व श्री संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्ग 965 देहू-पुणे-पाटस-इंदापूर-अकलूज-बोंडले त्यामधील 72 किमी ते 104 किमी एकूण लांबी 32 किलोमीटर माळशिरस तालुक्यात सक्षम प्राधिकारी भूसंपादन तथा उपविभागीय अधिकारी माळशिरस उपविभाग अकलूज यांच्या नियंत्रणात भूसंपादन झालेल्या जमिनी व अंतर्भूत असणारे इमारत, घरे, पाईपलाईन, फळझाडे, वनझाडे यांचे मूल्यमापन करून भूसंपादन केलेल्या जमिनीचा निवाडा करून सदरच्या खातेदारांच्या नावे रक्कम आरटीजीएसद्वारे केली जात होती.
भूसंपादन प्रक्रिया पारदर्शक तर काही ठिकाणी संधीग्धता आढळून येत आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या विस्तारी करणांमध्ये सक्षम प्राधिकारी भूसंपादन तथा उपविभागीय अधिकारी माळशिरस, उपविभाग अकलूज अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या होऊन सदरचे कामकाज पूर्ण केलेले आहे. कार्यालयामधील कंत्राटी कर्मचारी तेच आहेत. काही बदललेले आहेत. त्यामुळे भूसंपादन करीत असताना अनेक चुका व अनियमितता झालेले पहावयास मिळत आहे. चुकून नकळत झालेल्या चुका आहेत ? का कंत्राटी कर्मचारी व सक्षम अधिकारी यांनी जाणीवपूर्वक केलेल्या आहेत ?, हे तपासून पाहणे गरजेचे आहे. कारण, भूसंपादित झालेली पत्र्याची घरे रातोरात दोन मजली इमारती तयार झालेल्या होत्या. शेतामध्ये पिण्याचे पाणी घरून घेऊन जावे लागत होते. त्या शेतामध्ये अचानक पाईपलाईनची जाळी तयार झाली. शेतामध्ये चिमणी बसायला झाड नव्हते परंतु, फळझाडे व वन झाडे यांनी भूसंपादित झालेले क्षेत्र गजबजून गेलेले होते. त्यामुळे खऱ्या अर्थान भूसंपादित झालेल्या जमिनी व त्यावरील दिलेले मोबदले तपासून पाहणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीमध्ये भूसंपादन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी घराच्या नोंदी घेतलेल्या आढळून आलेल्या आहेत. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी सध्याचे ग्रामपंचायत अधिकारी यांनी आपल्या अधिकाराचा जास्तच वापर केलेला पहावयास मिळत आहे. नकलीसाठी अर्ज देऊन सुद्धा माहिती लपवली जात आहे. दुष्काळी भागामध्ये ज्यांनी चार वेळा आमदार म्हणून काम केले असे चौकार आमदार जया भाऊ उर्फ जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास खात्याचा पदभार आलेला आहे. ग्रामविकास मंत्री जयाभाऊ गोरे यांनी माळशिरस तालुक्यातील भूसंपादन प्रक्रियेमध्ये ग्रामपंचायत अधिकारी यांनी केलेली अनियमितता व त्यामुळे झालेला शासनाच्या पैशाचा अपव्यय भरून काढून कोट्यावधी रुपये पुन्हा शासनाच्या खात्यात जमा होतील. यासाठी ग्रामविकास मंत्री जयाभाऊ गोरे यांच्याकडे बारामती झटका संपादक श्रीनिवास कदम पाटील निवेदन देऊन चौकशीसाठी साकडे घालणार आहेत. सामाजिक कार्यकर्ते यांनी आपल्या गावामध्ये असे गैरप्रकार झालेले असल्यास श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील 98 50 10 49 14 या नंबर वर संपर्क साधावा, असे आवाहन बारामती झटका परिवार यांचेकडून करण्यात येत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.