“आता पटलं गड्या आप्पाच” बँकेत लिपिक मात्र, लक्ष्मीनारायण नगरमध्ये पाच गुंठ्याच्या बंगल्यात राहवास आन् बायकोच्या गळ्यात १०० तोळ्यांचा सोन्याचा हव्यास…
आप्पांचा विषय लय हार्ड हाय, दादांच्या वसुलीचे एटीएम कार्ड हाय.. आत्ता आयकर विभागाची करडी नजर बी हाय, सगळं कसं मनासारखं होतंय म्हणून कर्मचारी बी खुश हायं….
अकलूज (बारामती झटका)
महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असणारे कीर्तनकार यांच्या कीर्तनात कायम वाक्य असते “आता पटलंय गड्या” या वाक्याचा प्रत्यय बँकेत लिपिक पदावर काम करणारा कर्मचारी उर्फ आप्पा आशिया खंडात सर्वात मोठे गाव असणारे आणि त्या गावात सुप्रसिद्ध लक्ष्मीनारायण नगरमध्ये पाच गुंठ्यात आलिशान बंगला आणि त्या बंगल्यात रहिवास असणाऱ्या बायकोच्या गळ्यात १०० तोळ्यांचा सोन्याचा दागिन्यांचा हव्यास असल्याची चर्चा परिसरातील महिलांमध्ये होत आहे. तर, समाजामध्ये व बँकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये आप्पांचा विषय हार्ड हायं, दादांच्या वसुलीचे एटीएम कार्ड हायं, आता सगळंच बिंग फुटलेलं असल्याने आयकर विभागाची करडी नजर लिपिकावर लागलेली असल्याने सगळं कसं मनासारखं होत आहे, म्हणून कर्मचारी खुश आहेत. अशा परिस्थितीची बँकेच्या क्षेत्रात गुपचूप गुपचूप कुजबुज सुरू आहे.
सहकारी बँकेत नोकरी म्हणजे खऱ्या अर्थाने उदरनिर्वाह होऊ शकतो, अशी परिस्थिती वीस वर्ष बँकेत नोकरी केलेल्या कर्मचाऱ्यांची आहे. अनेकांच्या घरावरील जुनापत्रा निघालेला नाही, मोटरसायकल वीस वर्षांपूर्वी बँकेत नोकरी लागल्यानंतर घेतलेली आहे तीच गाडी वापरत आहे. अनेक कर्मचारी वीस वर्षे झाले तरी अजून कायम झालेले नाहीत. बँकेत आप्पा या नावाने सुपरिचित असलेले कर्मचारी मात्र, आप्पांचा विषय लयं हार्ड हाय, दादांच्या वसुलीचे एटीएम कार्डच आहे, अशी परिस्थिती बँकिंग क्षेत्रामध्ये पहावयास मिळत आहे.
दादांच्या गाडीत प्रवास असल्याने बँकेच्या सर्वच कर्मचाऱ्यांचा आप्पा म्हणजे प्रति दादाच बनलेले होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांंवर जाणीवपूर्वक अन्याय करायचा एकाला अंगाशी एकाला जगाशी, अशी वागणूक सुरू होती. कर्मचारी वाट पाहत होते तो दिवस अखेर उजाडला आणि थेट आप्पाला अक्कलकोट दर्शन घडले. त्यामुळे आता बँकेतील रामायण पुढे येणार आहे. पाच गुंठ्यात बंगला, घरामध्ये सोने-नाणे इतर बँकात खाती सर्व आप्पांचा हिशोब लवकरच आयकर विभाग घेणार असल्याची कुजबुज बँकेच्या कर्मचाऱ्यांमधून सुरू आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.