ह. भ. प. अनिल महाराज पाटील, बार्शीकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे संगमेश्वरवस्ती, लोणंद येथे आयोजन

कै. अनुसया रूपनवर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन
लोणंद (बारामती झटका)
कै. अनुसया गेना रुपनवर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे आयोजन बुधवार दि. १४/८/२०२४ रोजी लोणंद, नजीक संगमेश्वरवस्ती, ता. माळशिरस, येथे करण्यात आले आहे. प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त ह. भ. प. अनिल महाराज पाटील, बार्शीकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कीर्तनानंतर आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. या पुण्यस्मरण कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन दगडू गेना रुपनवर, हनुमंत गेना रुपनवर, दत्तात्रय गेना रुपनवर, मनीषा महादेव शेंडगे, अजित ज्वेलर्स नातेपुते, श्रीनाथ एंटरप्राईजेस नातेपुते यांच्या वतीने करण्यात आले आहे.

तरी नजरचुकीने आमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच निमंत्रण समजून प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आग्रहाचे निमंत्रण समस्त रूपंवर परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.