ह. भ. प. भागवताचार्य शंकर महाराज शेवाळे यांचे सुश्राव्य कीर्तन ह. भ. प. बापूसाहेब महाराज मोरे देहूकर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार…..
निमगाव मगराचे येथील स्वर्गीय सौ. सुमनताई काकासाहेब सुर्वे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन…..
निमगाव म. (बारामती झटका)
निमगाव मगराचे ता. माळशिरस येथील स्वर्गीय सौ. सुमनताई काकासाहेब सुर्वे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त शनिवार दि. 11/01/2025 रोजी सकाळी 10.30 ते 12.30 या वेळेमध्ये ह. भ. प. भागवताचार्य शंकर महाराज शेवाळे यांचे जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे वंशज व देहू संस्थानचे माजी अध्यक्ष गुरुवर्य ह. भ. प. बापूसाहेब महाराज मोरे देहूकर यांच्या उपस्थितीत सुश्राव्य किर्तन संपन्न होणार आहे.
तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी कीर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाच्या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे ज्ञानेश्वरी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा काकासाहेब सुर्वे आणि सुर्वे परिवार यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.